नीरज चोप्राची अप्रतिम कामगिरी सुरुच; फिनलँडमध्ये Kuortane Games मध्ये मिळवलं सुवर्णपदक

Kuortane Games 2022 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic Games) सुवर्णपदक मिळवणाऱ्या नीरज चोप्राने त्याचा भन्नाट फॉर्म कायम ठेवला आहे. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सुवर्णपदाकाला गवसणी घातली आहे. नीरज चोप्राने फिनलँड येथील कुओर्ताने स्पर्धेत (Kuortane Games) सुवर्णपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने या स्पर्धेत 86.89 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे नीरजने फिनलँडमध्ये काही दिवसांपूर्वी नुरमी गेम्समध्ये 89.30 मीटर अंतरापर्यंत भाला फेकत स्वत:चाच ऑलिम्पिकमधील आणि राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला होता. त्यावेळी तो सुवर्णपदक पटकावू शकला नाही. पण आज मात्र त्याने गोल्ड मिळवलं आहे. 

कॉमनवेल्थमध्ये भारताचं नेतृत्त्व करणार

क्रिडा जगतातील एक मानाची स्पर्धा असणारे कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) यंदा इंग्लंडमध्ये पार पडणार आहेत. इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात कॉमनवेल्थ गेम्स 2022 जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय खेळाडूंची घोषणा झाली आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) नेतृत्त्वाखाली 37 खेळाडूंचं पथक इंग्लंडला जाणार आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (Athletics Federation of India) यांनी कॉमनवेल्थ गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या 37 खेळाडूंमध्ये 18 महिला असून उर्वरीत पुरुष आहेत.

  

हे देखील वाचा- 

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous उपराजधानी हळहळली| वीज पडून तीन शेतकऱ्यांसह बैलजोडीचा मृत्यू

Check Also

IND vs ENG : दे दणादण… सामना एक विक्रम अनेक, भारतीय खेळाडूंचा इंग्लंडवर सर्जिकल स्ट्राइक

कँटबरी : भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आजच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाची चांगलीच धुलाई केली. …

भारताच्या हातून सामना कसा निसटला, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडने सांगितलं रहस्य

मोहाली : भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात २०८ धावा केल्या, पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा …