National Voter Day 2023: राष्ट्रीय मतदार दिन का साजरा करतात? घ्या जाणून सविस्तर…

National Voter Day 2023: भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणजे 25 जानेवारी. 2011 पासून राष्ट्रीय मतदान दिवसाला सुरूवात झाली. याचा उद्देश भारतातील नागरिकांना मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरुक करणे हा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा हा लोकशाहीता सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीत मताला स्वत: चे महत्त्व आहे. कोणत्याही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते. मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. 

निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?

निवडणूक आयोगाची (ECI) स्थापना पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. भारतात दरवर्षी निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी 18 वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते. दरवर्षी मतदार दिनाला एक थीम ठेवली जाते. यंदाची थीम (voter day Theme) ‘निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी बनवणे’ ही आहे.  

हेही वाचा :  VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये एका मुलीला बसवलं, दुसरीला बसवताना मुलीसह ट्रेनखाली गेले वडील; दुर्घटना पाहून आई बेशुद्ध

25 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो

राष्ट्रीय मतदार दिन 24 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवी पाटील यांच्याहस्ते सुरू करण्यात आला. 1950 मध्ये या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यामुळेच 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून दिली जाते. तसेच भारत निवडणूक आयोग यंदा देशभरात 13 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. 

वाचा: वसंत पंचमीला सरस्वती पूजन का करतात? जाणून घ्या तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व  

भारताची प्रगती आणि विकास..

तसेच या दिवशी नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली जाते. कारण प्रत्येक नागरिकाचे मत नवा भारत घडवते. भारताची प्रगती आणि विकास हे मतदारांच्या मताने ठरवले जाते. राष्ट्रीय मतदार दिनाचे स्वतःचे खास कारण आहे. देशाचा जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. 

राष्ट्रीय मतदार दिवस 2023 थीम

निवडणुका सर्वसमावेशक (Inclusive), प्रवेशयोग्य (Accessible) आणि सहभागी (Participative) बनवणे हा राष्ट्रीय मतदार दिन 2023 च्या थीमचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय मतदार दिवस 2023 ची थीम अधिकाधिक लोकांना त्यांचे वय, लिंग, वंश किंवा इतर वैशिष्ट्ये विचारात न घेता निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. भारत निवडणूक आयोग संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांचा प्रवेश सुलभ आणि सुधारण्यासाठी उपायांवर लक्ष केंद्रित करतो. 

हेही वाचा :  Air India Peeing Incident : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …