CM Letter:मुख्यमंत्र्यांच्या नावे 51 हजार पत्र लिहिली; काढली मोठी मिरवणूक, नक्की काय आहे प्रकरण?

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव: आपल्याला आपल्या गावातील समस्या या सोडवायच्या असतात.त्यासाठी आपल्याला कायमच आधार असतो तो म्हणजे आपल्या येथील प्रशासनाचा. त्यामुळे आपणही पुर्णपणे त्याकडे लक्ष देऊन आपल्या आपल्या गावाची प्रगती कशी होईल याकडे लक्ष देत असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. ज्यात चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावे 51 हजार पत्र लिहिली गेली आहेत. परंतु नक्की काय प्रकरण आहे हे सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. (people wrote 51 thosand letters for cm demanding infrastrutural changes in their village for farmers)

गेल्या अनेक वर्षांपासून काम रखडलेल्या पाडळसरे धरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी अमळनेरकर तालुक्यातील शेत वीकरी रस्त्यावर उतरल्याच पाहायला मिळाला. तब्बल 51 हजार पत्र मुख्यमंत्र्यांचे नावे लिहून त्या पत्रांचे मिरवणूक काढत शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधलं तसेच ही 51 हजार पत्र पोस्ट कार्यालयातून मुख्यमंत्र्यांना पाठवून पाडळसरे धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं साकडे या शेतकऱ्यांनी घातल आहे. अमळनेर तालुक्यात सिंचनासाठी वरदान ठरणारा पाडळसे प्रकल्प गेल्या 23 वर्षांपासून रखडलेला आहे.

हेही वाचा :  Maharashtra Politics : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? गिरीश महाजनांनी सांगितली पडद्यामागची कहाणी

हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सिंचन योजनेत करून केंद्र सरकारने निधी मंजूर करून तो पूर्ण करावा.. या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या पाडळसळे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण अमळनेर शहरात 51 हजार पत्रांची मिरवणूक काढण्यात आली व ही सर्व पोस्ट कार्यालयातून पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा, तसेच नागरिकांचा यावेळी सहभाग असल्याचं पाहायला मिळालं. हा प्रकल्प लवकरात पूर्ण न झाल्यास आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत मतदानावर बहिष्कार टाकु असा इशाराही शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे. 

आपल्या गावातील अनेक प्रकल्प रखडल्यामुळे लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावानं फक्त पत्रचं नाही लिहिली तर त्यांच्यासाठी लिहिलेल्या पत्रांची मिरवणूकही काढली आहे. त्यातून एक-दोनचं पत्र नाहीत तर ग्रामस्थांनी चक्क 51 हजार म्हणजे जवळपास गावातील सर्वच नागरिकांची संख्या या पत्रांची असावी इतक्या पत्रांची मिरवणूक काढण्यात आली आहे.

CM Letter, 51 thosand letters, eknath shinde, maharashtra politics,

त्यामुळे सध्या ही मिरवणूक सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरतो आहे. आता या पत्रांना मुख्यमंत्री रिप्लाय देणार की नाही याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या या पत्रांची मिरवणूक तुम्ही या व्हिडीओतून पाहून शकता. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

हेही वाचा :  'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …