MITL Job: महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पत्त्यावर द्या मुलाखत

MITL Job: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेडमध्ये ओएसडी (एचआर) , असिस्टंट-एसएपी, अकाऊंट्स ऑफिसर (अकाऊंट्स अॅण्ड कम्प्लायन्स), प्रोजेक्ट मॅनेजरचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे. ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर ही भरती केली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मुंबई मुख्यालय आणि औंरगाबाद येथे नोकरी करावी लागणार आहे.

ओएसडी (एचआर) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम किंवा एमबीए इन एचआरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

सहाय्यक एसएपी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बी.सी.एस/पीजीआयएन ई अॅण्ड सी/आ.टी/पी.जी इन सी.एस/पीजीआयएन ई अॅण्ड सी/ आयटी/पीजी इन सीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांनी एमआयटीएलने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

MITL Job
लेखा अधिकारी (लेखा आणि अनुपालन) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.com and Inter CA पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी एमआयटीएलने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  MAH CET MBA 2022: एमबीए आणि एमएमएस प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी सुरु

प्रोजेक्ट मॅनेजर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए इन मार्केटिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी एमआयटीएलने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

Government Job: बारावीनंतर सरकारी नोकरी करायचीय? या विभागांमध्ये करा अर्ज
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज कॉन्फरन्स हॉल, डीएमआयसी सेल, पहिला मजला, एमआयडीसी ऑफिस, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९३ या पत्त्यावर पाठवायचे आहेत. ९ जानेवारी २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. तर १० जानेवारी रोजी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट [email protected] वर सविस्तर तपशील पाहता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

हेही वाचा :  Schools Subsidy: एक निर्णय आणि राज्यातील ६ हजार शाळा, ६३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार फायदा

CFSL Job: सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
Career Tips: लाखोंचा पगार आणि चांगल्या नोकरीसाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात? जाणून घ्या सर्वकाही

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …