BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत मिळेल नोकरी; पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या

BMC Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असला तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई पालिकेत सहाय्यकारी परिचारिका प्रसविका म्हणजेच असिस्टंट नर्स मिडवाइफच्या एकूण ४२१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे तसेच पालिकेतर्फे देण्यात आलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

असिस्टंट नर्स मिडवाइफ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  राज्यभरातील पालिकांमध्ये होणार भरती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

BSNL Recruitment: भारत संचार निगममध्ये बंपर भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

BMC Job details

मुंबई पालिकेअंतर्गत मिळेल नोकरी; पात्रता, अर्ज प्रक्रिया सर्वकाही जाणून घ्या

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

२५ जानेवारी २०२३ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई- ४००००१२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

Fire Brigade Job: बारावी उत्तीर्णांना अग्निशमन विभागात नोकरी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार
MITL Job: महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पत्त्यावर द्या मुलाखत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …