CFSL Job: सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

CFSL Recruitment: बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये (Centbank Financial Services Limited) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (CFSL Job 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. येथे तुम्हाला चांगल्या पदासह उत्तम पगाराची नोकरी मिळविण्याची शक्यता आहे.

सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये असिस्टंट वाइस प्रेसिडंट (Assistant Vice President)ची १ जागा, मॅनेजर (Manager)च्या एकूण २ जागा आणि फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह (Front Office Executive) ची १ जागा अशा एकूण ४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी मिळणार आहे.

असिस्टंट वाइस प्रेसिडंट या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लॉ ऑफिसर अंतर्गत येणारा कार्यभाग पूर्ण करावा लागेल. यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एलएलएम/एलएलबी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा. संस्थेने जाहीर केलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार ते ६० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

हेही वाचा :  Naval Ship Repair Yard Recruitment 2023 – Opening for 180 Apprentice Posts | Apply Online

मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांला फायनान्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करावे लागेल. यासाठी त्याच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमबीए/पीजीडीएम/मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असावा. तसेच फ्रेशर उमेदवार देखील यासाठी अर्ज करु शकतात. संस्थेने जाहीर केलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३० हजार ते ४० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

CFSL Job: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. फ्रेशर उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार ते ३० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

हेही वाचा :  इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडियामध्ये नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

५ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Government Job: बारावीनंतर सरकारी नोकरी करायचीय? या विभागांमध्ये करा अर्ज

Career Tips: लाखोंचा पगार आणि चांगल्या नोकरीसाठी कोणती कौशल्य आवश्यक असतात? जाणून घ्या सर्वकाही

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …