IND vs AUS: दिल्लीत तब्बल पाच वर्षानंतर रंगणार कसोटी सामना; धर्मशाला, अहमदाबादही शर्यतीत

Australia Tour of India: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border–Gavaskar Trophy) कसोटी सामना दिल्लीत आयोजित करण्याची चर्चा आहे. दिल्लीला पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचं यजमानपद मिळेल. उर्वरित तीन कसोटी सामने अनुक्रमे अहमदाबाद (Ahmedabad), धर्मशाला (Dharamshala) आणि चेन्नईमध्ये (Chennai) खेळले जाण्याची शक्यता आहे. 

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ”  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चार कसोटी सामन्यांतील दुसरा कसोटी कसोटी सामना दिल्लीत खेळला जाऊ शकतो.” दौरा आणि कार्यक्रम समितीच्या बैठकीनंतर सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. धर्मशाला येथे 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला गेला. यानंतर भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथे पार पडण्याची शक्यता आहे. 

नरेंद्र मोदी स्टेडियमवर अखेरचा सामना
बीसीसीआयच्या रोटेशन फॉर्म्युल्यानुसार दिल्लीला कसोटी सामन्याचं यजमानपद मिळणं निश्चित मानलं जातंय. दिल्लीत 2017 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात अखेरचा कसोटी सामना खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या आगामी भारत दौऱ्यातील कसोटी सामन्याचा पहिला सामना हैदराबाद येथे होऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीला बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याचं आयोजन केलं होतं. अशा परिस्थितीत बेंगळुरूमध्ये कसोटी सामना होणं, जवळजवळ अशक्य आहे. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. या मालिकेतील एक सामना डे-नाईट खेळला जाणार आहे. पण या चार कसोटींपैकी कोणता सामना डे-नाईट असेल? हे अद्याप ठरलेलं नाही.

हेही वाचा :  हद्दचं झाली राव! मोहम्मद अलीनं बेन स्टोक्सवर काढला मालिका गमावल्याचा राग, त्यानं भरमैदानात...

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी अतिशय महत्त्वाची
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून ही एक अतिशय महत्त्वाची मालिका असेल. भारतासाठी हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे शेवटचे चार सामने असतील. भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 4-0 नं पराभूत करावं लागेल, जे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी अत्यंत आव्हानात्मक असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका होत आहे. परंतु 2024 पासून सुरू होणार्‍या आयसीसीच्या पुढील फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये  पाच सामने असतील.

Reels

हे देखील वाचा-

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …