एक नाही, दोन नाही, तर तीनदा नेदरलँड्सच्या हातून निसटलं जेतेपद; यंदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज

Netherlands Football Team: फुटबॉलमधील दिग्गज संघांमध्ये समाविष्ट होणाऱ्या नेदरलँड्सचा (Netherlands)  संघाच्या हातून एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन वेळा फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup Qatar) ट्रॉफी निसटली. 2010 मध्ये नेदरलँड्सचा संघ फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता, पण पदरी निराशाच आली. त्यानंतर 2014 च्या फिफा वर्ल्डकपमध्येही संघानं उपांत्यफेरी गाठली खरी, पण त्यानंतर संघाला जणू कोणाची नजरच लागली. नेदरलँड्सचा परफॉर्मन्स इतका घसरला की, त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या युरो कपच्या स्पर्धेतही प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळेत नेदरलँड्स 2018 च्या विश्वचषक स्पर्धेसाठीही पात्र ठरू शकला नाही. मात्र, गेल्या वर्षभरापासून नेदरलँड्सचा संघ पुन्हा एकदा फॉर्मात आलाय. सध्या फुटबॉल विश्वातील दिग्गज संघांमध्ये नेदरलँड्सची गणना केली जात आहे. 

युरो कप 2020 मधील धमाकेदार फरफॉर्मन्सनंतर नेदरलँड्स आता फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या दमदार 26 खेळाडूंसज मैदानात उतरणार आहे. सध्या हा संघ फिफा क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे. या नेदरलँड्सच्या संघात व्हर्जिल व्हॅन डायक (Virgil Van Dijk), मेम्फिस डेफे (Memphis Depay) आणि डी जोंग (De Jong) यांसारखे स्टार खेळाडू आहेत. 

हेही वाचा :  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या आरोपांवर मँचेस्टर युनायटेड क्लबकडून स्पष्टीकरण

नेदरलँड्सचा संघ यंदाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या कतारच्या फुटबॉल संघासोबत ‘ग्रुप-अ’ मध्ये आहे. या ग्रुपमध्ये सेनेगल आणि इक्वेडोरसारख्या संघांचाही समावेश आहेत. क्रिडा विश्लेषकांच्या मते, ग्रुप-ए पाहिला तर नेदरलँड्ससाठी राउंड ऑफ-16चा मार्ग सोपा असणार आहे. नेदरलँड्स फिफा वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना 21 नोव्हेंबर रोजी सेनेगल विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर नेदरलँड्सचा 25 नोव्हेंबरला इक्वाडोर आणि 29 नोव्हेंबरला कतारसोबत सामना असणार आहे. दरम्यान, फिफा वर्ल्डकपच्या शेड्यूलमधील प्रत्येक ग्रुपमधील टॉप-2 संघ पुढच्या फेरीसाठी पात्र असणार आहेत. 

फिफासाठी नेदरलँड्सचा स्क्वॉड : 

Reels

गोलकीपर्स : जस्टिन बिजलो, एंड्रीज नोपर्ट, रेमको पासवीर.

डिफेंडर्स : नाथन एके, डेले ब्लाइंड, वर्जिल वान डाइक, डेंजल डम्फ्रिस, जेरेमी फ्रिम्पोंग, मॅथिज डि लिट, टायरेल मलेसिया, जुरियन टिंबर, स्टीफन डि व्रिज.

मिडफील्डर्स : स्टीफन बर्गइज़, फ्रेंकी डी जोंग, डेवी क्लासेन, ट्युन कुपमेनियर्स, मर्टन डी रुन, ज़ावी सिमोंस, केनिथ टेलर.

फॉरवर्ड्स : स्टीवन बर्गजिन, मेम्फिस डिपै, कॉडी गापो, विंसेट जेनसन, लुक डी जोंग, नोहा लेंग, वॉट वेगहॉर्स्ट.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIFA WC 2022: पोर्तुगालचा संघ पहिल्या विश्वचषक ट्रॉफीच्या शोधात; रोनाल्डोसह ‘या’ 26 खेळाडूंवर मोठी जबाबदारी

हेही वाचा :  R Ashwin ऑस्ट्रेलियाविरुद्ध करु शकतो खास रेकॉर्ड, दिग्गज फिरकीपटू हरभजनला मागे टाकण्याची संधी 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …