म्हाडाची पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी; ‘या’ योजनेतील सदनिकांच्या किंमती10 टक्क्यांनी कमी

Mhada Pune Lottery 2023 :  म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाने पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांच्या बंपर लॉटरीची घोषणा केली होती. म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 सदनिकांची ऑनलाइन अर्ज नोंदणी तसेच अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे.  पुण्यासह पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे म्हाडाची ही घरं असणार आहेत. 

कोणत्या जिल्ह्यात किती सदनिका? 

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक  गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
18 ऑक्टोबर 2023 रोजी याची संगणकीय सोडत निघणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

हेही वाचा :  Maghi Ekadashi Upvas: उपवास करणे आरोग्यासाठी फायदेशीर?

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी 

पुणे मंडळाच्या या सोडतीतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील म्हाळुंगे येथील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकाधिक अर्जदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून 5863 नागरिकांना हक्काची घरे मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या स्वप्नपूर्तीप्रती आपले उत्तरदायित्व अधिक ठरत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

नूतन IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) संगणकीय प्रणालीद्वारे पुणे मंडळ सदनिका विक्री करिता सोडतीची प्रक्रिया राबवली जात असून म्हाडाच्या मुंबई मंडळाने ज्याप्रमाणे सोडत काढल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्काळ ऑनलाईन प्रथम सूचना पत्र, स्वीकृती पत्र व तात्पुरते देकार पत्र पाठवण्याची कार्यवाही केली. अशाच प्रकारची अंमलबजावणी पुणे मंडळाच्या सोडतीतही करुन सर्वसामान्य नागरिकांना म्हाडाच्या सुलभ, लोकाभिमुख, प्रशासकीय कार्यप्रणालीची प्रचिती द्यावी, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 अशी आहे लॉटरीची पूर्ण प्रक्रिया    

 पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात 18 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 5 सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. 29 सप्टेंबर 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दिनांक 9 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील अर्जदारांना ऑनलाईन दावे-हरकती 12 ऑक्टोबर, 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 16 ऑक्टोबर, 2023 रोजी सायंकाळी सात वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

हेही वाचा :  मगरींनी भरलेल्या नदीत फुटबॉलपटूने मारली उडी, त्यानंतर एकच थरार; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …