शिंदेची सभा संपल्यावर तोच स्टेज तोच माईक आणि…. अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले

विशाल करोळे, झी मिडिया, संभाजीनगर : ठाकरे आणि शिंदे यांचा पुन्हा एकदा थेट आमना-सामना होणार आहे. यावेळेस मात्र, ज्युनीयर ठाकरे आणि शिंदे एकमेकांना भिडणार आहेत(Maharashtra Politics). थेट जाहीर सभेच्या माध्यमातून युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)  आपले शक्ती प्रदर्शन करणार आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद अर्थात संभाजीनगर मध्ये   (Sambhaji Nagar) ठाकरे आणि शिंदे हे सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने  ऐन थंडीत  संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुनच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचले आहे. अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे(Latest Political Update).  

आदित्य ठाकरे यांच्या सभेला आम्ही विरोध केला नाही असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी सिल्लोड मध्ये सभा न घेण्याच्या सूचना पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना दिल्याचे सत्तार यांनी सांगितले.

पोलिसांना बदनाम करू नये. यात आमचा हस्तक्षेप नाही. यामुळ पर्यायी जागेवर आदित्य ठाकरे यांनी सभा घ्यावी नाहीतर त्यांना लोक रणछोडदास म्हणतील असा टोला सत्तार यांनी लगावला.

हेही वाचा :  ठाण्यातूनही निवडणूक जिंकणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले "तुमचा जन्मही..."

आदित्य ठाकरे यांच्या सभेला स्टेज नसेल, माईक नसेल आणि लोकही नसतील तर श्रीकांत शिंदे यांची सभा झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी आमच्याच स्टेजचा माईकचा आणि लोकांचा वापर करून भाषण द्यावं असंही अब्दुल सत्तार म्हणाले. 

एकाच दिवशी ठाकरे आणि शिंदेची सभा

संभाजीनगर (Sambhaji Nagar) जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये (Sillod) ठाकरे आणि शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. 7 नोव्हेंबर रोजी अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) मतदारसंघात  खासदार श्रीकांते शिंदे सभा घेणार आहेत. याच ठिकाणी आदित्य ठाकरे देखील सभा घेत आहेत.

आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली

खासदार श्रीकांते शिंदे यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. तर, वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली.  या सभेच्या परवानगीवरुन संभाजीनगरमध्ये चांगलाच गदारोळ उठला. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या सभेला आंबेडकर चौकाजवळील बाह्य रस्त्यावर परवानगी देण्यात आली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या ‘या’ मार्गांसाठी ‘समर स्पेशल’ ट्रेनची सोय

Indian Railway : एकिकडे कोकण रेल्वेनं (Konkan Railway) पावसाळी वेळापत्रक जारी केलं नसल्यामुळं मध्य रेल्वेच्या …

‘माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता…’ पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील …