माझ्याइतकी वाईट पत्नी कोणीच नसेल.. मीच माझ्या नव-याला धोका द्यायाला पाडलं भाग.. कारण

आपल्याकडे लग्नाला एक पवित्र नाते समजले जाते. त्यामुळे लग्न मोडणे, तोडणे या गोष्टींना आपल्याकडे आजही थारा देत नाही. मुलापेक्षा मुलीच्या घरच्यांना याची जास्त धास्ती असते. त्यामुळेच मुलीची पाठवण करताना ते तिला सतत समजावतात की संसारी नीट राहा, काहीही झालं तरी शांत राहा. पण आजच्या पिढीच्या मुली सहनशील नक्कीच नाहीत. त्या एका मर्यादेपर्यंत सहन करतात पण कुठेतरी सहनशीलतेचा कडेलोट होतो. जेव्हा असा कडेलोट होतो आणि ज्याच्या सोबत लग्न झालंय त्याच्या सोबत राहणे शक्य होत नाही अशावेळेस मुली वेगळा विचार करतात आणि विभक्त होण्याचा निर्णय घेतात.

मात्र या स्थितीत आई वडिलांकडून आणि अन्य जवळच्या लोकांकडून सुद्धा म्हणावा तसा पाठींबा मिळत नाही. अशावेळी काही स्त्रिया हिमतीने निर्णय घेतात पण काही सहन करतच राहतात. पण समजा हाच घटस्फोट अविचाराने झाला असेल तर? मग नंतर पश्चाताप वाटतोच ना. आज आम्ही असाच महिलांचे अनुभव तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी अत्यंत चुकीची पावलं उचलली ज्याचा त्यांना पुढे पश्चाताप झाला पण समोर काहीच पर्याय उरला नव्हता. (गोपनीयतेच्या कारणांमुळे आम्ही व्यक्तींची ओळख उघड करत नाही.)

पतीपेक्षा कामाला महत्त्व दिले

मी नेहमीच करियरला महत्त्व देणारी स्त्री होती. मला आयुष्यात माझे ध्येय काहीही करून पूर्ण करायचे होते. मी कामच्या मागे एवढी वेडी झाली की लग्नानंतर मी माझ्या पतीला हवा तसा वेळ देऊ शकली नाही. मला माझ्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मध्ये संतुलन राखता आले नाही. आणि याचा असा परिणाम झाला की मला माझ्या पतीपासून वेगळे व्हावे लागले. मला या गोष्टीचे आजही वाईट वाटते की माझ्यामुळे त्यांचे आयुष्य देखील उध्वस्त झाले. जर मी वेळीच संसाराकडे लक्ष दिले असते तर आजही आम्ही एकत्र असतो.”

हेही वाचा :  या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

(वाचा :- माझी कहाणी: होणारा नवरा व माझी रोज टोकाची भांडणं होतात, फक्त ‘या’ एका गोष्टीसाठी आम्ही एकत्र आहोत, ऐकून हादराल)

नवऱ्याला धोका देण्यास केलं मजबूर

मी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीची काही वर्षे खूप आनंदात गेली पण हळूहळू मात्र माझा इंटरेस्ट कमी होत गेला. मला आयुष्यातच रसच उरला नाही. मी खूपच वेंधळ्यासारखी राहू लागली. सुंदर असूनही मी स्वत:कडे लक्ष देत नव्हती. माझ्या नवऱ्याने मला लाख परीने समजवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. अखेर एके दिवशी मी त्याला दुसऱ्या मुलीसोबत पकडले. आमच्यात वाद झाले. त्याने माफी मागितली. पण मी घटस्फोट घेतला. मात्र आज मला वाटते की मी जर वेळीच त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले असते आणि स्वत:च्या दिसण्याची, वागण्याची आणि राहणीमानाची काळजी घेतली असती तर आज आमचा संसार सुखी असता.

(वाचा :- काश..! हनीमूनला जाण्याआधी या गोष्टी कोणी मला सांगितल्या असत्या तर माझ्याकडून ‘ही’ एक मोठी चूक कधीच घडली नसती..)

नव-याला केलं दुर्लक्षित

आपल्या लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्याची चूक कधीही करू नका. मी माझ्या आयुष्यात ही चूक केली होती, त्यानंतर मी आयुष्यात पूर्णपणे एकटे पडले. इतर कोणत्याही नात्याप्रमाणेच आमचे वैवाहिक जीवनही आनंदी होते. आमच्या लग्नाची सुरुवातीची वर्षे आनंदाने आणि उत्साहाने भरलेली होती. पण कालांतराने मी माझ्या पतीला गृहीत धरू लागले. माझी ही वृत्ती त्याने काही दिवस सहन केली तरी माझा अहंकार कालांतराने वाढतच गेला. मी त्याची खूप मस्करी करायची, त्याला काहीही बोलायची. त्याला पतीप्रमाणे मी कधीच वागवलं नाही हीच माझी मोठी चूक होती. सुरुवातीला प्रेम प्रेम म्हणून त्याने देखील सगळं सहन केलं. पण जेव्हा त्याला कळलं की माझा अहंकार वाढतच चालला आहे आणि माझी लेखी त्याला काहीच किंमत नाही तेव्हा त्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आज जेव्हा मी त्या गोष्टीचा विचार करते तेव्हा मी त्यासाठी स्वत:ला दोषी मानते.

हेही वाचा :  WhatsApp वर तीन ब्लू टिक म्हणजे सरकार तुमचे मेसेज पाहातंय? व्हायरल होणाऱ्या 'त्या' मेसेजमागील सत्य काय?

(वाचा :- काश..! लग्नाआधी मला ‘या’ 5 गोष्टी माहित असत्या तर बरं झालं असतं, प्रत्येक पुरूषाच्या घरी असंच वातावरण असतं का?)

एक्ससोबत करायची नवऱ्याशी तुलना

माझ्या स्वभावाची एक वाईट गोष्ट म्हणजे मी सतत तुलना करत असते. मी माझ्या पतीची देखील माझ्या एक्स सोबत सतत तुलना करायची. काहीही छोटी मोठी गोष्ट घडली की मला वाटायचं की माझा एक्स या बाबतीत चांगला होता आणि माझा नवरा काहीसा कमी आहे आणि मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याच्या तोंडावर त्याला बोलून दाखवायची. आमच्या संपूर्ण घरात माझा नवरा खूप चांगला होता जो माझ्या चेह-यावर एक हसू आणण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी सदैव तयार असायचा पण मला ते कमीच असायचं आणि यासाठी मी माझ्या आनंदाचं क्रेडिट कधीच त्याला दिलं नाही. एका मर्यादेनंतर त्याला हे सगळं सहन करणं जड जाऊ लागलं आणि एकतर्फी वाटू लागलं ज्यामुळे त्याने घटस्फोट मागितला. आजही मी या सर्वांसाठी स्वत:लाच दोषी मानते.

(वाचा :- नवरा श्रीमंत नसता तर चुकूनही लग्न केलं नसतं’ या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम)

मी त्याचा आत्मविश्वास कमी केला

माझा पती सतत त्याचे प्रॉब्लेम येऊन मला सांगायचा. त्याच्याकडे प्रॉब्लेमची अजिबात कमतरता नव्हती. सुरुवातीला मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू मलाच या गोष्टीचा कंटाळा येऊ लागला व मी त्याच्याकडे लक्ष देणे बंद केले. त्याच्या देखील ही गोष्ट लक्षात आली असावी. यावरूनच एकदा आमच्यात वाद झाले व तेव्हा मी त्याला तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही आणि सतत समस्या घेऊन घरी येणं बंद करा असे म्हटले. ती गोष्ट त्याच्या मनाला लागली व त्याने घटस्फोट घेतला. मी जर स्वत:वर नियंत्रण ठेवले असते आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित पुन्हा आम्ही एकत्र येऊ शकलो असतो पण मी तो नाही केला.

हेही वाचा :  सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप

(वाचा :- काश..! गर्भश्रीमंत घराण्याची सून होण्याआधी मला या गोष्टी माहित असत्या, तर माझ्यासोबत जे घडलं ते कधीच झालं नसतं)

मी कधीच त्याच्यावर प्रेम केलं नाही

माझ्या तुटलेल्या लग्नातून मी एक गोष्ट शिकले ती म्हणजे रोमांस ही सुखी आणि निरोगी वैवाहिक जीवनाची गुरुकिल्ली आहे. वैवाहिक नातेसंबंधात प्रेमच पती-पत्नीला जवळ आणते. मात्र, हे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. माझ्या पतीने नेहमी आमच्या वैवाहिक जीवनात रोमांस टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्याला नेहमीच तो बालिश आहे असं भासवून दिलं. त्यामुळे माझ्या आयुष्यात असा एक दिवस आला जेव्हा तो मला कंटाळला आणि सोडून निघून गेला.

(वाचा :- मला जडल्यात काही विचित्र सवयी, जर त्या मी आई-वडिलांसमोर कबूल केल्यात तर मला मुलगी म्हणायलाही त्यांना वाटेल लाज)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …