Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

How dangerous Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. (Coronavirus New Variant) जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमध्ये कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता, भारत सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

चीन व्यतिरिक्त जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकारांमुळे भारताची चिंता वाढली आहे आणि सरकार सतर्क झाले आहे. भारतात कोविड-19 च्या नवीन प्रकारांचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने तयारी सुरु केली असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आढावा बैठक घेऊन कोरोना संसर्गाबाबत चर्चा करणार आहेत.

हेही वाचा :  शिंदे - फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; भाजपच्या माजी आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

कोविड-19 च्या BF.7 व्हेरिएंटचा चीनमध्ये कहर  

चीनमध्ये, Omicron चे sub-variant BF.7 (Omicron Sub-variant BF.7)याने कहर केला आहे आणि  हा व्हेरिएंट लोकांना झपाट्याने संक्रमित करत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनची राजधानी बीजिंगमधील 70 टक्के लोक या व्हेरिएंटच्या विळख्यात आले आहेत आणि हळूहळू मृतांची संख्याही वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की लोकांना अंत्यसंस्कारासाठीही बराच वेळ वाट पाहावी लागते. यानंतर भारतासह इतर अनेक देश सतर्क झाले असून चीननंतर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा संपूर्ण जगात कहर केला असल्याची भीती व्यक्त होत आहे.

नवा व्हेरिएंट किती धोकादायक?

कोरोना विषाणूचे Omicron व्हेरिएंटआणि त्याच्या अनेक उप-व्हेरिएंटनी जगभरात कहर निर्माण केला होता आणि आता Omicron BF.7 (BF.7) चे उप-व्हेरिएंट चीनमधील लोकांना झपाट्याने संक्रमण करीत आहेत. Omicron च्या इतर व्हेरिएंटपेक्षा BF.7 चा संसर्ग दर खूप जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. BF.7 ची लागण झाल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी म्हणजेच उष्ण तापमानात कमी असतो. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना देखील ते सहजपणे संक्रमित करु शकतो. याशिवाय, जुन्या व्हेरिएंटच्या संसर्गानंतर निर्माण होणारी प्रतिकारशक्ती देखील सहजपणे खंडित केली जाऊ शकते. तज्ज्ञ सांगतात की BF.7 ची लागण झालेला रुग्ण 10 ते 18 लोकांना संक्रमित करु शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :  लघुशंका करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढला; थेट 194 KM लांब पोहचला

भारतासाठी BF.7 व्हेरिएंट किती धोकादायक ?

कोविड-19 चे नवीन व्हेरिएंट BF.7 (Covid-19 New variant BF.7) भारतासाठी किती धोकादायक आहे, याविषयी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, धोका फारसा नाही, परंतु तरीही सतर्क राहण्याची गरज आहे. अँटी टास्क फोर्सचे वरिष्ठ सदस्य आणि कोविड लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले की, चीनमधील परिस्थितीबद्दल भारताने काळजी करण्याची गरज नाही. कारण अशी परिस्थिती येथे होणार नाही. मात्र, यासोबतच सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले गेले आहे आणि यामुळे बहुतेक लोकांमध्ये संसर्गाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आहे.

ही 3 लक्षणे दिसताच सावध व्हा

Omicron चे sub-variant BF.7 (Omicron Sub-variant BF.7) लोकांना झपाट्याने बांधित करु शकतो. परंतु ते फारसे धोकादायक नाही आणि त्याची लक्षणे ओमिक्रॉनच्या जुन्या व्हेरिएंटसारखीच आहेत. या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यानंतर, रुग्णांमध्ये गंभीर घशाचा संसर्ग, अंगदुखी, सौम्य किंवा खूप ताप यासारखी लक्षणे दिसत आहेत.

बचावासाठी हे काम त्वरित करा

बदलत्या ऋतूमध्ये बहुतेक लोक सर्दी आणि फ्लूला बळी पडत आहेत, परंतु जर तुम्हाला तीन दिवसांपेक्षा जास्त ताप असेल आणि BF.7 ची लक्षणे दिसत असतील तर लगेच कोरोना चाचणी करावी. याशिवाय जे लोक आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त आहेत त्यांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी. याशिवाय लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनीही काळजी घ्यावी.

हेही वाचा :  पुण्यात लग्नाच्या नादात तरुणाने गमावले तब्बल 92 लाख रुपये; एका सल्ल्याने गमावली आयुष्याभराची कमाई



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …