Men’s Day : केस गळणं वंध्यत्वाचं मुख्य लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष ‘या’ पदार्थाला करा हद्दपार

इंटरनॅशनल मेन्स डे (International Men’s Day) 19 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. कारण पुरूषांच महत्व साजर केलं जाऊ शकेल. मात्र पुरूषांवर एक मोठं संकट येताना दिसत आहे. दर 3 पुरुषांपैकी 1 पुरुष वंध्यत्वाचा बळी आहे आणि अभ्यासानुसार, गेल्या 60 वर्षांत पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.

केस गळणे आणि कार्यक्षमता कमी होणे ही लक्षणे

MyoClinic च्या मते, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची मुख्य लक्षणे म्हणजे केस गळणे किंवा लैंगिक कार्यक्षमता कमी होणे. शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या पुरुषांना सेक्स करणे खूप कठीण जाते. त्याच वेळी, जर तुम्हाला अंडकोषाच्या आत किंवा आजूबाजूला काही ढेकूळ, सूज किंवा वेदना जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​Soya खाण्यातून करा हद्दपार

soya-

प्रथिने मिळविण्यासाठी पुरुष सोया उत्पादने घेतात. परंतु अलीकडील अभ्यासानुसार अधिक सोया फूड आणि आयसोफ्लाव्होन शुक्राणूंच्या कमी एकाग्रतेशी संबंधित आहेत. ज्या पुरुषांनी सोयाचे अधिक सेवन केले त्यांच्या शुक्राणूंची एकाग्रता सोया उत्पादने न खाणाऱ्या पुरुषांपेक्षा 32% कमी होती. म्हणूनच पुरुषांनी त्यांच्या आहारात सोया उत्पादने मर्यादित ठेवावीत.

हेही वाचा :  International Men's day : Sperm काऊंट कसा वाढवावा? ५ गोष्टी ठरतील जालीम उपाय, खाताच १०० स्पीडने वाढतील शुक्राणू

(वाचा – What to Avoid After Coffee : कॉफीनंतर ही ८ औषधे कटाक्षाने टाळा, नाहीतर डोक्यावर राहिल मृत्यूची टांगती तलवार))

​हे विटामिन अजिबात कमी होऊ देऊ नका

व्हिटॅमिन डी पुरुष प्रजननक्षमतेसाठी फायदेशीर आहे. हे उत्तेजक म्हणून काम करते. ज्यामुळे शरीरात टेस्टोस्टेरॉन वाढते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे अपुरे उत्पादन होण्याची शक्यता जास्त असते. व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. अंडी देखील बी जीवनसत्त्वे आणि डी 3 (सॅल्मन फिश आणि कॉड लिव्हर ऑइल देखील व्हिटॅमिन डी 3 मध्ये समृद्ध असतात) चा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

(वाचा – ऑपरेशनशिवाय होणार मुळव्याधावर उपचार, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं ही भाजी पाइल्सला मुळापासून उपटून टाकेल)

​अश्वगंधा आहे पावरफुल

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अश्वगंधा एक प्रभावी औषधी वनस्पती आहे. प्रजनन समस्या असलेल्या 75 पुरुषांचा तीन महिने अभ्यास करण्यात आला. दररोज पाच ग्रॅम अश्वगंधा शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढविण्यास मदत करते. हे औषधी वनस्पती तणावग्रस्त पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या देखील वाढवते.

(वाचा – Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला)

हेही वाचा :  Gold Hallmark : तुम्ही खरेदी केलेले दागिने नकली तर नाहीत ना? असा घातला जातोय ग्राहकांना गंडा

​शिलाजीत आहे रामबाण उपाय

अश्वगंधा व्यतिरिक्त, शिलाजीत देखील पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव दर्शवते. एका अभ्यासात, वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या ६० पुरुषांनी ९० दिवस जेवणानंतर दिवसातून दोनदा शिलाजीत घेतले. 90 दिवसांनंतर चाचणी केली असता 60% पेक्षा जास्त सहभागींनी त्यांच्या एकूण शुक्राणूंच्या संख्येत वाढ दर्शविली. त्याच वेळी, सुमारे 12% लोकांमध्ये शुक्राणूंची गतिशीलता वाढली.

वाचा – इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

​झिंक देखील ठरेल महत्वाचं

झिंक शुक्राणूंचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. पुरुषांना त्याची महिलांपेक्षा जास्त गरज असते. याव्यतिरिक्त, ते हार्मोन्सचे नियमन करते, जे पुरुषांच्या लैंगिक, प्रोस्टेट आणि टेस्टोस्टेरॉनच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. झिंकच्या कमतरतेमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि शुक्राणूंमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. झिंक मिळविण्यासाठी लाल मांस, बार्ली आणि बीन्ससारखे झिंकयुक्त पदार्थ खा.

(वाचा – शरीरातलं रक्त, पाणी सुकवून टाकतात हे १५ पदार्थ, यामुळेच कमी वयात होतात हार्ट अटॅक-कॅन्सरसारखे जीवघेणे आजार)

​दारूमुळे कमी होते शक्ती

अल्कोहोलमुळे हृदय आणि किडनीचे आजार तर होतातच पण पुरुषांच्या शुक्राणूंची संख्याही कमी होते. 2018 च्या अभ्यासानुसार, अल्कोहोल, मारिजुआना आणि कोकेन सारख्या औषधांचा वापर केल्याने शुक्राणूंच्या उत्पादनात घट दिसून आली.

हेही वाचा :  International Men's Day : जागतिक पुरुष दिनाची सुरुवात कशी आणि कुणी केली तुम्हांला ठाऊक आहे का?

(वाचा – थायरॉइड आणि डायबिटिजचं अस्तित्वच नष्ट करतील ‘ही’ हिरवी पानं, Deepika च्या न्यूट्रिशनिस्टने सांगितला रामबाण उपाय))

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …