घसघशीत सूट देतीये महिंद्रा! फेब्रुवारीतच पूर्ण करता येईल कारमालक होण्याचं स्वप्न; पाहा Offers

Mahindra and Mahindra Offers: नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नव्या वर्षात गाडी घ्यायचं स्वप्न तुम्हीही पाहिलं असेल. महिंद्रा तुम्हाला ही संधी देत आहे. 2024च्या फेब्रुवारीमध्येच महिंद्रा डिलरने मोठे डिस्काउंट आणि भरघोस सूट दिली आहे. MY2023 बोलेरो, बोलेरो निओ और मराजो या कारवर ऑफर्स दिल्या आहेत. त्याचसोबत एसयुव्ही आणि एमपीवी कारवरही बेनिफिट्स ऑफर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या महिन्यात XUV300 आणि  XUV400 EV वरदेखील मोठी सूट मिळत आहे. 

बोलेरो नियोवर भरघोस डिस्काउंट

फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही  MY2023 बोलेरो नियो खरेदी करण्याचा विचार करताय. तर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट डिस्काउंट, एसिस्ट उपकरण आणि एक एक्सटेंडेंट वॉरंटी देण्यात येणार आहे. N10 और N10 (O) या व्हेरियंटवर जवळपास 1 लाख रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळणार आहेत. तर, त्याच्या खालचे वेरिएंट N4 आणि N8 वर 69,000 रुपये 84,000 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळणार आहे. MY24 N4 आणि N8 व्हेरियंटवर अनुक्रमे 46,000 आणि Rs 54,000 रुपयांची सूट मिळत आहे, तर 2024 N10 आणि N10 (O) ट्रिम्सवर Rs 73,000 चे डिस्काउंट मिळत आहे.

हेही वाचा :  ​GB WhatsApp म्हणजे नक्की काय? काय आहे याचा वापर? कसं कराल डाऊनलोड? सर्व माहिती एका क्लिकवर

बोलेरो नियोचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मजबूत लॅडर फ्रेम असलेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. यात सात जण आरामात बसू शकतात. त्याचबरोबर 100hp, 1.5 लीटर डिझेल इंजिनची क्षमता आहे. 

महिंद्रा बोलेरोवर सूट 

2023मध्ये लाँच झालेल्या बोलेरो एसयुव्हीवर टॉप-स्पेक B6 (O) ट्रिमसाठी एकूण 98,000 रुपयांची सूट आहे, तर B4 आणि B6 व्हेरियंटमध्ये अनुक्रमे 75,000 आणि 73,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर बोलेरो B4, B6 आणि B6 (o)च्या M24 व्हर्जनवर या महिन्यात जवळपास 61,000 रुपये, 48,000 रुपये आणि 82,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. एंट्री लेव्हल बोलेरो बी2 वर फेब्रुवारी 2024मध्ये कोणत्याही ऑफर देण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, बोलेरो सद्यस्थितीत महिंद्रा कंपनीचे सर्वात जुने मॉडेल आहे. तर, 2026मध्ये याचे पुढील अद्यावत मॉडेल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मॉडेलमध्ये 76hp, 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. तसंच, मॅनुअल गिअरबॉक्सदेखील देण्यात आला आहे. 

महिंद्रा मराजोवर सूट 

महिंद्रा मराजो ही देखील कंपनीची बेस्ट सेलिंग कार आहे. या कारच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार एमपीव्ही असून 123 hp आणि 1.5 लीटर डिझेल इंजिनसोबत मॅनुअल ट्रान्समिशनसह येते. महिंद्रा डिलर या कारच्या तीन MY23 व्हेरिएंट्स M2, M4+ आणि M6+ वर 93,200 रुपयांची सूट मिळतेय. 

हेही वाचा :  भारतीय रेल्वेमध्ये 'मराठी तरुण-तरुणींना' संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …