शाहरुखकडे चाहत्यानं मागितला ‘पठाण’च्या कमाईतला हिस्सा

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेला शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याने ‘आस्क एसआरके’ (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. 

‘आस्क एसआरके’मध्ये शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला विचारलं आहे, ‘पठाण’च्या यशानंतर आता तुला कसं वाटतंय? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, “अजुनही विश्वास बसत नाही आहे… खूप कमाल वाटतंय”. एका नेटकऱ्याने विचारलं आहे, “तुम्ही रेड चिलीज भोजनालय कधी सुरू करणार आहात? यावर उत्तर देत एसआरके म्हणाला, “मेन्यू कार्ड डिझाईन केलं आहे. पण सध्या अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. त्यामुळे भोजनालय सुरू करण्यास वेळ लागेल.” 

शाहरुखच्या एका चाहत्यानं ‘पठाण’च्या यशाबद्दल त्याला विचारलं आहे, “पठाण’ हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. ‘पठाण’ सिनेमाचं यश जवळून अनुभवताना कसं वाटतयं? यावर उत्तर देत किंग खान म्हणाला, “पठाण’ हा सिनेमा मला खूप आवडला होता. पण हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडेल याचा मला अंदाज नव्हता. आदि आणि सिड्सचा माझ्यावर असलेला विश्वास आणि दूरदृष्टीमुळे हे शक्य झालं आहे”. 

किंग खानच्या एका चाहत्याने ‘पठाण’च्या हुडीचा फोटो शेअर केला आहे. बेडवर हुडी ठेऊन हा फोटो काढण्यात आला आहे. फोटो शेअर करत चाहत्याने लिहिलं आहे,”नुकतीच ही नवीन हुडी घेतली”. यावर शाहरुखने मजेशीर कमेंट करत लिहिलं आहे,”अरे वाह… जमिनीवर झोपला आहेस”. 

‘आस्क एसआरके’मध्ये एका नेटकऱ्याच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिलं आहे, “पठाण’ सिनेमा पाहायला पाच वेळा गेलो. 700 कोटींमधले एक कोटी मला देऊन टाका सर”. यावर शाहरुखने कमेंट केली आहे, “भावा ऐवढा रेट ऑफ रिटर्न शेअर मार्केटमध्येही मिळत नाही. आणखी काही दिवस थांब… मग बघू… हा…हा”. 

‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखचं हे तिसरं ‘आस्क एसआरके’ सेशन होतं. पण या सेशनचा चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. 

हेही वाचा :  Happy Birthday Kartik Aaryan : तरुणाईला वेड लावणारा कार्तिक आर्यन!

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shah Rukh Khan : #Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान आधीच म्हणाला, “लग्नाचा प्रस्ताव सोडून दुसरं बोला”



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …