महाराष्ट्रातील पर्यटन भारतीय नकाशावर ; पर्यटन क्षेत्रांच्या राष्ट्रीय प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम


मुंबई :  करोनानंतर आता विविध निर्बंध दूर होत असताना पर्यटन क्षेत्रेही खुली होत असून महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय नकाशावर आणण्यासाठी अमर्याद महाराष्ट्र (महाराष्ट्र अनलिमिटेड) ही मोहीम राबवण्यात येणार असून समुद्रकिनाऱ्यांपासून ते थंड हवेची ठिकाणे व जंगलांपर्यंत तुम्ही नाव घ्या आमच्याकडे ते आहे या संकल्पनेभोवती ही मोहीम आखण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांची राष्ट्रीय पातळीवर चांगली प्रसिद्धी व्हावी यासाठी दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूरसारख्या शहरांतील पर्यटनावर लेखन-यूटय़ूबसह विविध समाजमाध्यमांवरून कार्यक्रम करणारे ब्लॉगलेखक-प्रवासी-खवय्ये आदींसाठी महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रांचा दौरा ९ मार्चपासून आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर देशातील विविध ९ शहरांत-राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या पर्यटनाची प्रसिद्धी करणारे रोड शो ९ मार्चपासून होणार आहेत. त्याचबरोबर जुन्नर द्राक्ष महोत्सवसह १८ ते २० फेब्रुवारी या काळात पार पडला. त्याचधर्तीवर नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाई, पन्हाळा महोत्सव असे जवळपास २० महोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. या महोत्सवांच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रसिद्धीबरोबरच स्थानिकांना रोजगार व उत्पन्न मिळण्याची सोय उपलब्ध व्हावी असा विचार आहे. तसेच ५ वाहिन्या, मुद्रित माध्यमे, १० एअर इंडियाची विमाने, ५०० टक्सी आदी विविध माध्यमांद्वारे महाराष्ट्र पर्यटनाची प्रसिद्धी करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाने दिली.

हेही वाचा :  VIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?

The post महाराष्ट्रातील पर्यटन भारतीय नकाशावर ; पर्यटन क्षेत्रांच्या राष्ट्रीय प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …