यंदाच्या उन्हाळय़ात सरासरीपेक्षा अधिक तापमान


उन्हाळय़ाचे दीर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाकडून जाहीर

मुंबई : यंदाच्या उन्हाळय़ाचे दीर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. यानुसार कोकण, घाट प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरींची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

कोकण व घाट प्रदेश या भागातील किमान तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ६५ ते ७५ टक्के आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ६५ टक्के आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा येथे तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के आहे.

कमाल तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता कोकण, घाट आणि उत्तर महाराष्ट्रात ३५ ते ६५ टक्के आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे. राज्याच्या एकूण वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरीसारख्या स्थितीची शक्यता नाकारता येणार नाही, असे हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या पूर्वानुमानानुसार कोकण आणि घाट भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३५ ते ५५ टक्के तर उर्वरित महाराष्ट्रात ही शक्यता उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात ही शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे.

हेही वाचा :  नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ ; दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा

देशाची स्थिती

देशभरातील तापमानही यंदाच्या उन्हाळय़ात सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. यासाठी ‘ला निना’च्या स्थितीचा अभाव कारणीभूत ठरू शकते. ‘ला निना’ स्थितीमध्ये पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ओसरते तर ‘अल निनो’ स्थितीमध्ये हे तापमान वाढते. लवकरच ‘ला निना’चा प्रभाव होणार आहे. त्यामुळे समुद्राचे तापमान वाढेल; मात्र ‘अल निनो’ निर्माण होणार नाही. तटस्थ ‘ला निना’मुळे उन्हाळय़ात देशभरातील किमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

मार्च ते मे या कालावधीत पाऊस सरासरीइतका असणार आहे. १९६१ ते २०१० या कालावधीतील आकडेवारीनुसार मार्च महिन्यातील पावसाची सरासरी ३०.४ मिमी आहे.

The post यंदाच्या उन्हाळय़ात सरासरीपेक्षा अधिक तापमान appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …