Maharashtra Local Body Election : राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी

Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीतच होतील अशी शक्यता आहे. (Maharashtra Political News) याबाबत माहिती राज्याच्या नगरविकास आणि ग्रामपंचायत विभागातील सूत्रांनी दिली आहे. (Local Body Election ) सरकारने प्रशासकांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी नियोजन केल्याची माहिती आहे. ( Maharashtra Politics News) त्यामुळे राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 14 महापालिकांच्या निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Municipal Elections)

राज्यातील 25  जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका, नगरपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. देशात एप्रिल 2024 मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. तर ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. 

आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासकास तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्यास निवडणुका जूनपर्यंत पुढे जातील. त्यानंतर पावसाळा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीतच होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांनी या निवडणुका घेण्याची मागणी केली. महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊन दाखवा, असे आव्हान दिले आहे.

हेही वाचा :  Thackeray vs Shinde Updates : 'राज्यपालानी आघाडी सरकार पाडले, कोणत्या अधिकारात शिंदेंना CM पदाची शपथ दिली?'

महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती ?

शिंदे गट आणि भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस यांना काहीही करुन मुंबई महापालिकेवर सत्ता हवी आहे. याबाबत मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिंदे गटाने मुंबई महानगर महापालिकेवर विजय मिळवता यावा या दृष्टीने विभाग प्रमुखांची निवड करुन त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. तसे नियोजन आहे. त्यामुळे या निवडणुकात पुढे ढकलण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विरोधकांनी तसा आरोपही केला आहे.

दरम्यान, गेले कित्येक वर्ष ठाकरे गटाची एकहाती सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे देखील मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी घेताना दिसत आहे. हे सर्व सुरु असताना निवडणुकी कधी होणार आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी महानगर पालिका, नगर परिषदांच्या मुदती संपल्या आहेत पण अद्याप निवडणूक जाहीर होण्याची चिन्हे दिसत नाही. आता पुन्हा तीन महिने या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …