माधुरी दीक्षितनं शेअर केला रेट्रो लूकमधील व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…

Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षितनं (Madhuri Dixit) ओटीटीवर पदार्पण केलं आहे. माधुरीची पहिली वेब सीरिज ‘द फेम गेम’ (The Fame Game) ही आज (25 फेब्रुवारी) रिलीज झाली आहे. सध्या या सीरिजचं माधुरी आणि या सीरिजची टीम प्रमोशन करत आहे. या वेब सीरिजमधून जवळपास 27 वर्षानंतर माधुरी आणि अभिनेता संजय कपूर यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच माधुरीनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये माधुरी रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. 

माधुरीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आणि मानव कौल (Manav Kaul) हे ‘अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कमेंट करून नेटकऱ्यांनी माधुरीला मधुबाला यांची उपमा दिली आहे. तर काहींनी माधुरीच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलं आहे. 


‘द फेम गेम’ या सीरिजमध्ये माधुरीसोबत  संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुले, लक्ष्यवीर सरन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.’ या सीरिजचे दिग्दर्शन  बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांनी केले आहे. तसेच श्रीराव यांनी या सीरिजचे कथानक लिहिले आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous JEE Main Exam 2022: ‘अशी’ करा जेईई मेन्सची तयारी
Next रशियाला इशाऱ्या देणारी नाटो बॅकफूटवर, ही जबरदस्त मोठी खेळी

Check Also

समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; साकारणार ‘ही’ भूमिका

मुंबई, 17 सप्टेंबर-   समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा प्रचंड …

‘सुशांतची आत्महत्या नाही हत्याच’, आमिर खानच्या भावाचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई, 16 सप्टेंबर : सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू होऊन 2 वर्ष झाली आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर …