प्रेम विवाह, हुंडा अन् 6 पोलिसांनाच मारहाण! बिहारमधील डोकं चक्रावून टाकणारा प्रकार

Police Attacked On Crime Spot: बिहारमधील (Bihar Crime News) मुजफ्फरपूरमधील देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक विचित्र प्रकार घडला आहे. एका नवविवाहित महिलेला बेदम मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याआधी या पीडित महिलेच्या सासरच्या व्यक्तींना पोलिसांनाच मारहाण केली. या मारहाणीमध्ये 6 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्रेम विवाह अन् मारहाण

हा सर्व प्रकार देवरिया पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बंदी गावामध्ये घडला. येथे राहणाऱ्या एका ज्योतिषाने 3 महिन्यांपूर्वी गावातील एका तरुणीबरोबर अंतरजातीय विवाह केला होता. प्रेमसंबंधांनंतर हे दोघे लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर काही दिवस सर्वकाही सुरळीत सुरु होतं. मात्र त्यानंतर काही दिवसांनी या ज्योतिषाच्या घरच्यांनी आपल्या सुनेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या महिलेला सासरच्या लोकांनी घरातून बाहेर काढलं. मात्र ही महिला रविवारी पुन्हा तिच्या सासरी गेली. या महिलेने घरामध्ये पाऊल ठेवताच पुन्हा तिला मारहाण करण्यात आली. सासरवाडीमधील अनेकांनी या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढलं. सासरचे लोक आपल्याकडून हुंडा मागत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 

हेही वाचा :  पत्नीच्या प्रियकराला जेवायला बोलवलं, रात्री बाजूलाच झोपवलं, अन् सकाळी घडला एकच थरार

पोलिसांना कळवलं पोलिस आले पण…

आपल्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती या महिलेने फोनवरुन पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही आरोपींनी हल्ला केला. यामध्ये प्रवीण कुमार, लक्ष्मण राम, नेहा कुमारी, सौरभ कुमार, विकाश कुमार आणि मनोज कुमार सिंह हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या सर्व जखमी कर्मचाऱ्यांना पारू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

आरोपींचा शोध सुरु

या प्रकरणामध्ये सरैयाचे प्रमुख पोलिस अधिकारी कुमार चंदन यांनी, “एका महिलेने फोनवर तिच्या सासरचे लोक तिला मारहाण करत असल्याची तक्रार केली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी पोहचली असता त्यांच्यावरच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात येईल,” अशी माहिती दिली. एवढ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण नेमकी कशी झाली, यासाठी आधीपासून काही तयारी करण्यात आली होती का? पोलिस कर्मचारी आणि आरोपींमध्ये आधी काय बोलणं झालं यासंदर्भातील तपासही केला जाणार आहे. 

मात्र अशाप्रकारे पोलिसांच्या एका टीमवरच हल्ला करण्यात आल्याने गावात तणावाचं वातावरण आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा :  Superstition : भुताटकीच्या संशयामुळे गाव सोडले; अंधश्रद्धेचा डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …