आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी उरले फक्त १० दिवस, पाहा डिटेल्स

केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. यासाठी अखेरची तारीख ३१ मार्च २०२२ ठेवण्यात आली होती. नंतर वाढून ३१ मार्च २०२३ करण्यात आली होती. यानंतर पुन्हा यात वाढ करण्यात आली असून ३० जून २०२३ करण्यात आली आहे. आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी अवघे १० दिवस उरले आहेत. जर तुम्ही हे काम अद्याप केले नसेल तर आजच करून घ्या. ३० जून नंतर ही लिंक करण्यासाठी १ हजार रुपये मोजावे लागतील.

कोणत्या बँकेतून पेमेंट केली जाऊ शकेल
अॅक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनेरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी यूनियन बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंड्सइंड बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया, या बँकाचा समावेश आहे.

वाचाः Google बंद करतेय हे पॉप्यूलर फीचर, आजच सेव्ह करा डेटा, १९ जुलै अखेरची तारीख

या स्टेप्स फॉलो करा
सर्वात आधी https://eportal.incometax.gov.in/ वर जा. क्विक लिंक्स सेक्शनमध्ये आधारवर क्लिक करा.
पॅन आणि आधार नंबर एन्टर करून व्हॅलिडिटी करा.
ओटीपीवरून व्हेरिफाय करून इन्कम टॅक्सवर क्लिक करा.
AY 2023-24 ची निवड करा. टाइप ऑफ पेमेंट मध्ये अदरची निवड करून कंटिन्यू वर क्लिक करा.
१ हजार रुपयाची अमाउंट अदर बॉक्स मध्ये आधीच भरली जाईल. कंटिन्यवर क्लिक करा.
पुढील पेजवर, मोड ऑफ पेमेंटला सिलेक्ट करा. हे तुम्हाला सिलेक्ट करण्यात आलेल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाईल.
पेमेंट करा.

हेही वाचा :  मनोज जरागेंचे लाड थांबवा अन् अटक करा, अन्यथा... गुणरत्न सदावर्तेंचा थेट इशारा

वाचाः Asus A5 ऑल-इन-वन डेस्कटॉप भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

वाचाः जपानचेही भारताच्या पावलावर पाऊल, गुगल आणि ॲपलचे वाढवले टेन्शन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …