लग्नासाठी ब्युटी पार्लरमध्ये तयार व्हायला गेली, पोलिसाने थेट गोळीच घातली… वाचा काय आहे नेमंक प्रकरण

Crime News : प्रेमात लोक इतके वेडे होतात की आपण काय करतोय याचं त्यांना भान राहत नाही. आपण करतोय तेच बरोबर आहे असंच प्रेमात वेडं झालेल्यांना वाटत असतं. प्रेमी युगुले प्रेम करताना एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात. मात्र यातून कधीकधी हिंसक घडल्याचेही समोर आले आहे. अशाच एका प्रकरणात बिहारमधल्या (Bihar crime) एका प्रियकराने प्रेयसी दुसऱ्यासोबत लग्न करत असल्याचा राग मनात ठेवून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी प्रियकराने प्रेयसीवर गोळ्या झाडून तिला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी बिहार पोलिसात (Bihar Police) हवालदार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे गोळी लागल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

ब्युटी पार्लरमध्ये घुसून गोळीबार

बिहारच्या मुंगेरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या रात्रीच वधूवर गोळ्या झाडून पोलीस हवालदाराने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला आणि त्याने तिथून पळ काढला. लग्नाच्या विधीपूर्वी मुलगी ब्युटी पार्लरमध्ये तयार होत होती. ब्युटी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर अचानक एका तरुणाने आतमध्ये शिरत तिच्यावर गोळी झाडली. गोळीबार करणारा तरुण तरुणीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. तरुणीवर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही आणि पळून गेला. हल्ला करणारा तरुण हा बिहार पोलिसांत हवालदार असून तो पाटण्यात तैनात आहे.

हेही वाचा :  'त्या' वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पंढरपुरातील रस्त्यावरील थरार

आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न

लग्नाच्या विधीपूर्वी ब्युटी पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोळी मुलीच्या खांद्याच्या मागच्या बाजूला लागून बाहेर पडली. गंभीर जखमी मुलीला सदर रुग्णालयात आणण्यात आले. यानंतर प्रियकराने आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःच्या डोक्यावर पिस्तुल ठेवून गोळीबार केला, मात्र पिस्तूल खाली पडले. यादरम्यान ब्युटी पार्लरमधील एका मुलाने गोळीबार करणाऱ्या अमन कुमार नावाच्या पोलीस हवालदाराला पकडले. मात्र तो कसा तरी त्याच्या तावडीतून सुटला आणि पळून गेला.

महेशपूरच्या तारापूर दियारा येथे राहणाऱ्या तरुणीचा विवाह रविवारी रात्री होणार होता. वरात येण्यापूर्वी ही मुलगी कस्तुरबा वॉटर वर्क्स येथील जावेद हबीब सलूनमध्ये तयार होण्यासाठी गेली होती. रात्री 8.30 च्या सुमारास प्रियकर अमन कुमारने ब्युटी पार्लरमध्ये घुसून तरुणीवर गोळी झाडली आणि स्वतःवरही पिस्तुलातून गोळी झाडली. गोळी झाडणारा तरुण हा महेशपूर गावातील रहिवासी आहे.

दरम्यान, रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तरुणीला लागलेली गोळी शरीराच्या कोणत्याही महत्त्वाच्या भागाला लागली नाही. गोळी खांद्याला लागून बाहेर निघून गेली. त्यामुळे मुलीच्या जीवाला कोणताही धोका नाही. प्राथमिक उपचारानंतर मुलीला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहो. पोलीस फरार अमनचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :  विराट कोहली लपुनछपून अयोध्येत पोहोचला? रस्त्यावर चाहत्यांकडून पाठलाग; VIDEO व्हायरल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …