लग्नानंतरही स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून शुंभागी झाल्या प्रशासकीय अधिकारी!

UPSC IAS Success Story सर्वसाधारणपणे लग्नानंतर परीक्षेचा अभ्यास करताना खूप कसरत करावी लागते. पण शुभांगी यांनी लग्नानंतरही स्पर्धा परिक्षांचा जिद्दीने अभ्यास केला. शुभांगी या मूळच्या करमाळ्यातील वंजारवाडी येथील आहेत.

शुभांगी यांचे वडील सुदर्शन केकाण हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत. शुभांगी या बीडीएस असून सध्या ते बारामतीतील श्रीरामनगर येथे वास्तव्यास आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दंतचिकित्सक म्हणून त्यांनी करमाळा येथेही काम केलेले आहे.लग्नानंतर पती स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून बँक अधिकारी झाल्यानंतर शुभांगी यांनीही कसून सराव केला. अहमदनगर येथील स्टेट बँकेत ते शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

त्यामुळे, पतीने देखील त्यांना या अभ्यासात बरीच मदत केली. मनात फक्त जिद्द ठेवली होती. त्याचबरोबर त्यांच्या सासूने देखील कानमंत्र दिला की, माझ्या काळात शिकले नाही. मात्र, तू शिकून पुढे जा. सासू-सासरे घर प्रपंच आणि सहा वर्षाच्या मुलाला सांभाळत या परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांनी देखील अतिशय जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला होता.

त्यांनी घरातच अभ्यास केला.विशेष म्हणजे सासर व माहेर दोन्ही कडून त्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाल्याने त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले.त्यांना देशात ५३०वा रँक प्राप्त झाला आहे. अखेर, त्या आय.ए.एस अधिकारी झाल्या. मैत्रिणींनो, आपल्या मनात जिद्द असेल तर घरच्यांच्या पाठिंब्याने आपण कोणतेही यश मिळवू शकतो.‌

हेही वाचा :  लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांडमध्ये (महाराष्ट्र) नवीन भरती, 10वी पाससाठी संधी.. | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …