फेसबुकपासून थ्रेट्सपर्यंत…तुमच्या अ‍ॅपमध्ये मेटाचे ‘हे’ नवे फिचर आलंय का?

Meta New Feature: आपला दिवसातील बराचसा वेळ फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्ससारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्क्रोलिंग करण्यात जातो. यूजर्स आपल्या या प्लॅटफॉर्मवर सातत्याने यावा यासाठी मेटादेखील स्वत:ला वेळोवेळी अपडेट करत असते. यामुळे युजर्सना वेळोवेळी फायदा होत असतो. मेटाने एक क्रॉस पोस्टिंग सुविधेचे परिक्षण सुरु केले आहे. ज्यामुळे युजर्सला फेसबुकहून थ्रेट्सवर पोस्ट शेअर करण्याची परवानगी असेल. याचा अर्थ एक युजर एकावेळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोघांवरही एकवेळेस स्टोरीज आणि रिल्स शेअर करु शकतात. 

कोणाला मिळणार सुविधा?

कंपनीने मीडियाला आपल्या परिक्षणाबद्दल माहिती दिली. ही सुविधा सध्या आयओएस यूजर्सला मिळतेय. यामध्ये यूरोपीय संघाचा समावेश नाही. ही सुविधा युजर्सला फेसबुकहून थ्रेट्सवर टेक्स्ट आणि लिंक दोन्ही पोस्ट करण्याची परवानगी देईल. 

युजरला प्रत्येकवेळी वेगळी पोस्ट आणि फोटो अपलोड करावा लागायचा. या प्रक्रियेमुळे अशा युजर्सला फायदा होणार आहे. 

थ्रेड्समध्ये मिळेल ट्रेंडिग टॉपिक फीचर 

फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सना आपले व्हिडीओ व्हायरल व्हावेत, असे नेहमी वाटत असते. यासाठी ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग टॉपिक शोधत असतात. पण आता युजर्सना यामध्ये आपला वेळ घालवण्याची गरज नाही.  मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी यासंदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. 

हेही वाचा :  राज्यात पावसासाठी पोषक वातावरण; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा

मेटाकडून थ्रेट्सवर एक नवे  ‘ट्रेंडींग टॉपिक’ फिचरचे परिक्षण करत आहे. प्लॅटफॉर्मवर कोणत्या गोष्टी ट्रेंडींगमध्ये आहेत, हे पाहण्याची सुविधा मिळू शकणार आहे. 

कंपनीने सुरुवातीला अमेरिकेतील युजर्ससाठी या सुविधेचे परीक्षण सुरु केले आहे. येथे आलेल्या प्रतिक्रियेनंतर अधिक देश आणि भाषांमध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे.  झुकरबर्ग यांनी थ्रेट्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. 

अमेरिकेमध्ये थ्रेड्सवर आजच्या टॉप विषयांबद्दल परीक्षण सुरु केले जाणार आहे. एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की इतर देश आणि भाषांमध्ये ही सुविधा सुरु केली जाणार असल्याचे झुकरबर्ग आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम, थ्रेट्स वापरणाऱ्या युजर्सना आता प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन वेगळी पोस्ट आणि फोटो अपलोड करण्याची गरज नाही. तसेच ट्रेंडिंग टॉपिकही इतरत्र शोधण्याची गरज नसेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …