Buisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात ‘अशी’ उभी केली 100 कोटींची कंपनी

Ahana Gautam Success Story: एखाद्याने आयआयटीमधून पदवी मिळवली असेल, शिक्षणाला खर्च करुन हार्वर्ड विद्यापीठातून अभ्यास केला असेल तर चांगल्या पॅकेजची नोकरी करावी, असे कोणालाही वाटेल. असे अनेक तरुण लाखोंच्या पॅकेजसह भारताबाहेर विशेषत: अमेरिकेत नोकरी करणे पसंत करतात. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण प्रवाहाविरुद्ध निर्णय घेणारे फार कमी तरुण असतात. ज्यांना स्वत:च्या कौशल्य, मेहनतीवर विश्वास असतो. आपण आज जाणून घेणार आहोत 30 वर्षीय अहाना गौतमची यशाची कहाणी जाणून घेऊया.

अहानाने चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते. कारण तिने ज्या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला त्या क्षेत्रात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आधीच चांगले काम करत होत्या. कंपनी मोठी करण्यासाठी तिला चांगल्या पगाराची परदेशी नोकरी सोडावी लागणार होती. भविष्यात पुढे काय होईल? हे तिला माहिती नव्हते. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. 

लढण्यााधीच पराभव स्वीकारण्याऐवजी अहानने लढण्याचा निर्णय घेतला. जोखीम पत्करली आणि थोडी बचत करून फराळ विकण्याने आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. 2019 मध्ये, अहाना गौतमने ओपन सिक्रेट नावाची हळद स्नॅक्स कंपनी सुरू केली. 

हेही वाचा :  एक कप चहाने केलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न उद्ध्वस्त, विद्यार्थिनीची हायकोर्टात धाव, वाच काय आहे प्रकरण

नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय

राजस्थानच्या भरतपूर येथे राहणाऱ्या अहानाने 2010 मध्ये आयआयटी मुंबईमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. त्यानंतर हॉर्वर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. यानंतर तिने अमेरिकेत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम केले. प्रोजेक्ट अँड गॅम्बल (P&G) कंपन्यांसोबत काम केले. 
 हे सर्व करत असताना तिला व्यवसायाची आयडीया सुचली. यामागे कारणही तसंच होत. अमेरिकेत राहणाऱ्या अहानाला हेल्दी स्नॅक्स मिळणे दुरापास्त झाले होते. येथूनच तिला ओपन स्कॅनची कल्पना सुचली. तिने ताबडतोब भारताला जाणारे विमान पकडले आणि मायदेशी परतली.

ओपन स्नॅक्स कंपनीची सुरुवात 

अमेरिकेतील चांगली नोकरी सोडून अहाना भारतात परतली. विशेष म्हणजे तिने आपल्या व्यवसायात आईला सोबतीला घेतले. आईला सोबत घेऊन कंपनी सुरू करण्याची कल्पना तिला सुचली. आईने अहानाच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला आणि आर्थिक सहाय्य केले. आईच्या मदतीने अहानाने 2019 मध्ये ओपन सिक्रेट स्टार्टअप सुरू केले. सध्या जे बाजारात स्नॅक्स मिळतात ते जंक फूड जास्त असतात. अशावेळी हेल्दी फूड शोधणाऱ्यांना कमी पर्याय असतात. त्यांना टार्गेट कस्टमर ठेवून तिने जंक फ्री स्नॅक्स विकायला सुरुवात केली. माझ्या कंपनीच्या स्नॅक्समध्ये शुद्ध साखर, मैदा किंवा कृत्रिम रंग नसतात, असे ती दाव्याने सांगते. 

हेही वाचा :  अभिमानास्पद! सांगलीतील युवा दिग्दर्शक शेखर रणखांबेचा देशात डंका

3 वर्षात 100 कोटी रुपयांची कंपनी 

2019 मध्ये अहानाने स्वतःचा स्टार्टअप ‘ओपन सीक्रेट’ सुरू केला. 3 वर्षांत तिने आपल्या कंपनीचे मूल्यांकन 100 कोटींवर नेले. एका छोट्या कल्पनेतून तिने मोठा उद्योग उभा केला. आज अहाना गौतमच्या नावाचा ‘फोर्ब्स इंडिया  अंडर 30’ मध्ये समावेश आहे. या व्यवसायातही नाविण्य आणण्याचा प्रयत्न करत असते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …