Ram Mandir Unknown Facts: राम मंदिराच्या आतील घंटा खूपच खास, 7 वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Ram Mandir Unknown Facts: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राम मंदिर अयोध्येत आता प्रत्यक्ष रुप घेत आहे. 22 जानेवारीला येथील मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्या हे अध्यात्माच्या तलावात डुंबण्याचे पवित्र ठिकाण आहे. पवित्र सरयू नदीच्या काठावर वसलेले हे प्राचीन भारतातील सर्वात प्रतिष्ठित शहरांपैकी एक आहे. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात ‘राम लला’चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे. या शुभमुहूर्तावर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ते भव्य करण्यासाठी रामनगरीत जोरदार तयारी सुरू आहे.

अशा परिस्थितीत इतक्या वर्षांनंतर उभारले जाणारे श्रीराम मंदिर किती भव्यदिव्य आहे? हे जाणून घेण्याची प्रत्येक देशवासीय आणि रामभक्ताला उत्सुकता आहे. येथे आम्ही तुम्हाला ‘राम मंदिर क्विझ’च्या माध्यमातून मंदिराशी संबंधित काही रंजक माहिती सांगणार आहोत…

प्रश्न- मंदिराच्या आतील घंटेची सर्वात खास गोष्ट कोणती?
उत्तर- मंदिराच्या आतील घंटेचा प्रतिध्वनी संपूर्ण शहरात ऐकू येतो. या घंटेचे वजन 2100 किलोग्रॅम आहे. जी अष्टधातूपासून बनलेली आहे.  हे राम मंदिरात वाजवल्या जाणार्‍या घंटेचे वैशिष्ट्य आहे. 

हेही वाचा :  फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."

प्रश्न- राम मंदिराचे भूमिपूजन कधी झाले?
उत्तर- 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत भगवान श्री राम मंदिराची पायाभरणी झाली. 
 
प्रश्न- राम मंदिराची उंची किती?
उत्तर- राम मंदिर 3 मजली असून आणि त्याची उंची 162 फूट आहे.

प्रश्न- राम मंदिराला किती दरवाजे?
उत्तर- राम मंदिरात एकूण 36 दरवाजे आहेत. त्यापैकी 18 दरवाजे गर्भगृहाचे असतील.

प्रश्न- राम मंदिराचे दरवाजे कोणत्या लाकडापासून बनवले जात आहेत?
उत्तर- हैदराबादचे कारागीर सागवान लाकडापासून राम मंदिराचे दरवाजे बनवत आहेत.

प्रश्न- राम मंदिरात किती खांब असतील?
उत्तर- राम मंदिरात एकूण 392 खांब असतील. यापैकी गर्भगृहात 160 खांब आणि वरच्या मजल्यावर 132 खांब असतील. 

प्रश्न: सरयू नदी कोणत्या नदीला मिळते?
उत्तर- हिमालयातून उगम पावलेली सरयू नदी उत्तर भारतातील गंगा मैदानात वाहते आणि छपरा आणि बलिया दरम्यान गंगा नदीला मिळते. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘…तर लोकांचा विश्वास उडून जाईल,’ सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सुनावलं, ‘कसं काय तोंड द्यायचं?’

राज्य शालेय सेवा आयोगाच्या सुमारे 25 हजार नियुक्त्या रद्द करण्याच्या कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकेववरील सुनावणीदरम्यान …

‘कालपर्यंत मलाही ठाऊक नव्हतं की…’; BJP प्रवेशानंतर शेखर सुमनची पहिली प्रतिक्रिया

Shekhar Suman Joins BJP: लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु असतानाच भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक …