घरची परिस्थिती बेताची; कमवा व शिका योजनेत काम करून मुलगी झाली ‘PSI’ | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

PSI Success Story : आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असली तर माणूस प्रत्येक परिस्थितीला मात देऊन यश प्राप्त करतो. पैसा, सोयी सुविधा अशा कित्येक चमकणाऱ्या गोष्टी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीपुढे अपयशी ठरतात. असाच काहीस आदर्श आपल्यापुढे अनेक ल भे करतात त्यापैकीच एक म्हणजे किल्ले पुरंदरच्या उपडोंगररांगेतील कुंभोशी (पो. केतकावळे, ता. पुरंदर) येथील दुर्गम भागातील कु. अमृता भरत बाठे. या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कन्येनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत PSI होण्याचं स्वप्न पूर्ण केले. MPSC Success Story

घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्याने अमृताने कमवा व शिका योजनेत काम करून शिक्षण पूर्ण केले. तर एम.पी.एस.सी.चा अभ्यास करताना पुण्यातील खर्च भागावा यासाठी तिने पुण्यातील काही खाजगी क्लासमध्ये शिकविण्याचे काम केले. कु. अमृता बाठे यांचे वडील भरत बाठे व आई सौ. संगिता दोघेही चार भातखाचरांची शेती करतात. बाकी क्षेत्र डोंगरपड, माळपड असेच असल्याने चांगल्या ठिकाणी शिकविण्याचे वडीलांचे स्वप्न अपुरे राहणार होते.

अमृताच्या मागे एक लहान भाऊ व एक बहीण यांची देखील जबाबदारी कुटुंबावर होती. म्हणून स्वतःच्या कुंभोशी गावात चौथीपर्यंत जिल्हा परीषदेच्या मराठी शाळेत शिकल्यावर गावात हायस्कूल नसल्याने पंचाईत झाली. याकाळात शेतीच्या व घरच्या कामात मोठी मुलगी म्हणून अमृताची कुटुंबात मदत होत असे. शेवटी वडीलांनी शोधून अमृतासाठी पुण्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या संस्थेत मुलींच्या वसतीगृहात प्रवेश मिळविला.

हेही वाचा :  वडिलांचे स्वप्न झाले पूर्ण; लेकीच्या अंगावर अभिमानाची वर्दी!

इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण महर्षी कर्वे यांच्या महिलाश्रम हायस्कूल येथे पूर्ण झाले. शिकत असताना अमृता मैदानावरच्या विविध खेळांमध्ये सहभागी होत असे. त्यातून कबड्डी राज्यस्तरापर्यत व इतर खेळ विभागापर्यत खेळू शकली. येथेच खेळामुळे शारिरीक क्षमतांचा विकास झाला. अमृताने मैत्रिणींना पोलीस भरतीची तयारी करतांना बघितले होते. त्यातूनच आपणही स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, अशी ईच्छा तिच्या मनात उत्पन्न झाली. पोलिस भरतीचा फाॅर्म भरुन तयारी नसताना परिक्षा दिली व त्यात तिला अपयश आले.

परंतु, तरीही खचून न जाता आधी पेक्षाही मोठे स्वप्न पहिले. खाकी वर्दीचे स्वप्न तेही किमान पोलीस उपनिरीक्षक होण्याचे मनात पक्के केले. मात्र त्यासाठी पदवी शिक्षण पूर्ण लागते. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाकरीता महर्षी कर्वेच्या संस्थेतच पुण्यात श्री सिद्धिविनायक महाविद्यालयामधुन बी.बी.ए पदवी घेऊन हे शिक्षण पुर्ण केले.

पदवी शिक्षण घेत घेतच खर्च भागवण्यासाठी महाविद्यालयात कमवा आणि शिका योजनेमध्ये काम केलं. त्यातूनही खर्च भागत नसल्याने शिकताना खासगी शिकवण्यांमध्ये शिक्षिकेचा पार्टटाईम जाॅब केला. अमृता बाठे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर जाॅब करतच एमपीएससीचा अभ्यास करायला लागली. त्यात तिची मावशी ज्योती कदम यांच्याकडे राहूनच 2019 मध्ये परीक्षा दिली. त्यात केवळ दोन गुणांनी संधी हुकली.

हेही वाचा :  अभिमानाची गोष्ट; रिक्षा चालकाच्या मुलाने मिळवले आयएएस पद !

त्यानंतर 2020 च्या परिक्षेत कोणत्याही परिस्थितीत पास होण्याचा निर्धार केला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये जाहिरात आली पण मध्येच कोरोनाचं संकट आल्याने परिक्षा 4 वेळा पुढे ढकलली गेली आणि तब्बल 19 महिन्यांनी लांबली व अमृताला पुण्यातून गावाकडे यावे लागले. तेव्हा आजी -आजोबांकडे आजोळी वागजवाडी येथे अभ्यासासाठी राहून परिक्षा दिल्या.

आजोळी वागजवाडी येथे राहूनच मैदानी तयारीही चांगली झाली होती. अनेक अडचणी येत असताना परत मराठा आरक्षण समस्येमुळे अमृताचा निकाल 4 महिने लाबंला व 4 जुलैला निकाल लागला आणि अमृताची पोलिस उपनिरीक्षक 2020(PSI) पदी अखेर निवड झाली. घरच्यांना नव्हे नातेवाईकांसह तर गावाला आनंद झाला. सत्कार व कौतुक झाले.

“माझे शिक्षण व नंतरची धडपड यातून मला एवढच सांगावसं वाटतं की 2020 ते 23 काळ माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी खुप चिंतेचा होता. लग्नासाठी घरचे मागे लागत होते.. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहून अभ्यास सुरू ठेवला. प्रयत्न करीत राहिलं की नक्की यश मिळतं, त्यासाठी माझे उदाहरण पहा.” – कु. अमृता बाठे, कुंभोशी, पो. केतकावळे, ता. पुरंदर

हेही वाचा :  RPF : रेल्वे संरक्षण दल अंतर्गत 4660 जागांसाठी मेगाभरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती सुरु

IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी …

आई अंगणवाडी सेविका तर वडील भाजीपाला विक्रेते, पण लेकाने मोठ्या पदावर मिळविली नोकरी!

आपल्या देशाची सेवा करायची आहे.हाच एक निश्चय मनाशी बाळगून संजूने स्वप्न बघितले आणि ते साकार …