प्रभू रामचंद्राच्या पवित्र नावावरून ठेवा मुलांची युनिक नावे

घरात बाळाचा जन्म झाल्यानंतर वेगळाच आनंद असतो. साधारण १२ व्या दिवशी बाळाचे नामकरण करण्यात येते. आपल्याकडे नामकरण विधी करण्याला वेगळेच महत्त्व आहे. त्यातही राम नवमीच्या आसपास घरात मुलाचा जन्म झाला असेल आणि तुम्ही रामभक्त असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

रामाच्या नावावरून तुम्हाला आपल्या बाळाचे युनिक नाव ठेवायचे असेल तर आम्ही काही वेगळी आणि आधुनिक नावं सुचवत आहोत. प्रभू रामचंद्राची काही नावं प्रसिद्ध आहेत. मात्र काही वेगळी नावं तुम्हाला माहीत नसतील तर घ्या जाणून. (फोटो सौजन्य – Canva, Freepik.com)

ब्रम्हज्ञ

ब्रम्हज्ञ

ब्रम्हज्ञ या नावाचा अर्थ ‘देवांचा देव’, ज्याला सर्व ज्ञान प्राप्त आहे असा. रामचंद्र हा भगवान विष्णूचा अवतार समजण्यात येतात. त्यामुळे त्यांना सर्वज्ञान प्राप्त होते असंही म्हटलं जातं. हे नाव थोडे कठीण असले तरीही वेगळे आहे. त्यामुळे मुलासाठी तुम्ही या नावाचा विचार करू शकता.

धन्विन

धन्विन

धन्विन अर्थात सूर्याच्या किरणांपासून जन्मलेला असा याचा अर्थ होतो. सूर्यासारखा तेजस्वी पुत्र, धैर्यवान आणि कणखर पुत्र म्हणजे धन्विन. हा शब्द संस्कृत शब्दावरून घेण्यात आला आहे. भारतीय राजांमध्येही हे नाव दिसून आले आहे. रामचंद्राचे हे नाव तुम्ही मुलासाठी निवडू शकता.

हेही वाचा :  Video : पिशवी आत राहिली म्हणून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला अन्... शिर्डीत साईभक्तांना मारहाण

(वाचा – श्रीकृष्णाच्या मुलांची नावं माहीत आहेत का? मुलांसाठी युनिक नावांचा शोध असल्यास व्हाल आनंदी)

शाश्वत

शाश्वत

जगातील एकमेव सत्य म्हणजे प्रभू. सत्य म्हणजे शाश्वत. रामाचाच दुसरा अर्थ शाश्वत असे म्हटले जाते. तुमच्या बाळासाठी हे नाव तुम्ही निवडू शकता. राम नवमीच्या दिवशी बाळाचा जन्म झाला असेल तर नक्कीच हे नाव शोभेल.

(वाचा – Chaitra Navratri 2023: देवी दुर्गेच्या नावावरून ठेवा आपल्या मुलीचे नाव, 11 नावांची अर्थासहित नामावली)

वेदात्म

वेदात्म

वेदाचा सर्वस्वी आत्मा म्हणजे वेदात्म. प्रभूचा आत्मा वेदात नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही असा वेदात्म या नावाचा अर्थ आहे. रामचंद्राच्या नामावलीतील हे नाव वेगळे असून तुम्ही त्याचा वापर करून शकता.

(वाचा – हनुमानाची ही नावं आहेत अगदी आधुनिक, मुलासाठी निवडा ही नावं राहील मारूतीची कृपादृष्टी)

जैत्राय

जैत्राय

तुमच्या मुलाचे आद्याक्षर ज आले असेल आणि तुम्ही रामचंद्राचे भक्त असून वेगळ्या नावाचा विचार करत असाल तर या नावाची निवड करा. विजय मिळवणारा असा जैत्राय. जैत्राय नाव मोठं अथवा कठीण वाटत असेल तर जैत्र असेही नाव तुम्ही ठेऊ शकता.

हेही वाचा :  Dalai Lama : 'त्या' वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की...

पराक्ष

पराक्ष

पराक्ष म्हणजे प्रकाश अथवा तेज. आधुनिक नावाच्या शोधात असाल तर पराक्ष हे उत्तम नाव आहे. पारंपरिक आणि आधुनिक नावाचा हा उत्तम मेळ आहे. भारतीय बाळांच्या नावाच्या यादीत हे युनिक आणि वेगळं नाव आहे.

परस्म

परस्म

तुम्ही एखाद्या पारंपरिक नावाचा विचार करत असाल तर परस्म हे नाव ठेऊ शकता. अत्यंत पुढारलेला आणि देवाशी संबंधित असा या नावाचा अर्थ असून २१ व्या शतकात तुम्ही रामाच्या या नावाचा वापर करू शकता.

सौम्याय

सौम्याय

सौम्याय अर्थात अतिशय मृदू, सौम्यतेने कार्य करणारा असा. प्रभू रामचंद्राच्या नावामध्ये या नावाचाही समावेश आहे. तुम्हीही नव्या नावाचा शोध घेत असाल तर सौम्याय या नावाचा विचार करू शकता. मृदूभाषी असाही त्याचा अर्थ आहे.

श्यामंग

श्यामंग

आम्ही तर या नावाच्या प्रेमात आहोत. श्यामंग म्हणजे सावळा. या नावातच जादू आहे. सावळा असा राम म्हणजेच श्यामंग. वेगळ्या आणि युनिक नावाचा तुम्ही विचार करत असाल तर श्यामंग नाव निवडू शकता. विष्णू आणि कृष्ण असाही या नावाचा अर्थ आहे.
तुम्हीही आपल्या मुलाच्या नावासाठी वेगळ्या आणि युनिक नावाचा अर्थ शोधत असाल आणि रामाचे भक्त असाल तर या नावांची यादी तुमच्यासाठीच आहे.

हेही वाचा :  सीमा हैदरनंतर आणखी एक तरुणी सीमा ओलांडणार, भारतीय तरुणाशी थाटामाटात केलं लग्न, फोटोंची चर्चा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …