Dalai Lama : ‘त्या’ वादग्रस्त Video नंतर दलाई लामांनी मागितली मुलाची आणि कुटुंबाची माफी, म्हणाले की…

Dalai Lama Kissing Boy Viral Video : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अकडले आहेत. काही महिन्यांपू्र्वी एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की त्यांचा उत्तराधिकारी एक महिला असू शकते पण ती आकर्षक असलाया हवी. त्यानंतर स्त्रीवादी गटांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. आता तर त्यांचा अतिशय धक्कादायक व्हिडीओने लोकांची झोप उडाली आहे. (dalai lama apologises to boy and family Dalai Lama asking minor boy to suck his tongue Viral Video courts controversy)

घृणास्पद कृत्यानंतर खळबळ 

एका कार्यक्रमात दलाई लाला यांनी एका लहान मुलाला पहिले ओठांवर चुंबन घेतलं आणि त्यानंतर स्वत:ची जीभ बाहेर काढत त्याला “माझी जीभ चोखतोस का?,” असं विचारलं. धक्कादायक म्हणजे हे सगळं सुरु असताना उपस्थित टाळ्या वाजत होते. या धक्कादायक कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. त्यानंतर त्यांचावर सर्व थरातून टीका झाली. 

dalai_lama

अखेर त्यांनी माफी मागितली…

या वादग्रस्त व्हिडीओनंतर खुद्द दलाई लामा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी आपल्या कृत्यामुळे कोणी दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवाय त्यांनी लहान मुलाची आणि त्याचा पालकाची माफी मागितली आहे. दलाई लामा यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक निवदेनही टाकण्यात आलं आहे.

दलाई लामा यांचं निवदेन

या निवेदनात दलाई लामा म्हणाले की, ”सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्या व्हिडीओमध्ये दलाई लामा यांना एक लहान मुलगा मिठी मारु का असं विचारतो? पण त्यांच्या या कृतीमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मुलगा, कुटुंबीय आणि जगभरातली मित्रांची दलाई लामा माफी मागू इच्छितात.”

त्यापुढे असंही सांगण्यात आलं आहे की,  ”अनेक वेळा कार्यक्रमादरम्यान आणि कॅमेऱ्यांसमोर त्यांना भेटायला आलेल्या सर्वांशीच ते निष्पापपणे आणि खेळकरपणे खोडी काढत असतात. पण या घटनेमुळे वाद निर्माण झाल्याने दलाई लामा यांनी खेद व्यक्त केला आहे.”

हेही वाचा :  Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …