गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी

Black Line During Pregnancy: गर्भावस्थेदरम्यान महिला आपल्या शरीरात अनेक बदल होताना पाहत असतात. काही बदल हे हैराण करणारे असतात तर काही बदलांमुळे ताणही येतो. पण हा बदल गर्भावस्थेदरम्यान होणारच आहे हे स्वीकारता आले पाहिजे. असाच एक बदल म्हणजे पोटावर काळी रेषा येणे, ज्याला गर्भ रेषा अथवा Linea Nigra असे म्हटले जाते. प्रसूतीतज्ज्ञ डॉ. श्वेता पाटील यांनी आम्हाला याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

​लिनिया नायग्रा म्हणजे काय?​

​लिनिया नायग्रा म्हणजे काय?​

What Is Linea Nigra: लिनिया नायग्रा ही गर्भावस्थेत असणाऱ्या महिलेच्या पोटावर दुसऱ्या तिमाहीदरम्यान उभी रेषा दिसून येते. महिलांच्या बेंबापासून ते अगदी प्युबिक एरियाच्या शेवटापर्यंत ही रेषा दिसते. काही महिलांच्या पोटावर तर अगदी स्तनांच्या खालपासून ही रेषा दिसते. असंख्य महिलांना ही रेषा गर्भावस्थेदरम्यान असतेच. साधारण दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये ही रेषा स्पष्ट होते.

हेही वाचा :  नवरीवर वरमाई भारी, लग्न कियाराचं पण स्वॅग मात्र आईचा, पिंक लेहंगा-डायमंड दागिन्यांत भासली जणू 20 वर्षाची तरूणी

​कोणत्या महिलांमध्ये दिसून येते लिनिया नायग्रा​

​कोणत्या महिलांमध्ये दिसून येते लिनिया नायग्रा​

Does Everyone Get A Linea Nigra: साधारणतः ८०% गर्भावस्थेतील महिलांमध्ये ही काळी रेषा दिसून येते. पण तुमच्या त्वचेच्या रंगानुसार या लाईनकडे लक्ष जाऊ शकते. ही रेषा तुमच्या शरीरातील पिगमेंटेशननुसार स्पष्ट दिसते.

(वाचा – सोनम कपूरने दाखवली ६ महिन्याच्या वायुची पहिली झलक, नव्या आईने काय आहार सुरू करावा)

​पोटावरील ही Linea Nigra कधी नाहीशी होते?​

-linea-nigra-

When Does Linea Nigra Vanished: जेव्हा तुमच्या शरीरातील हार्मोनचा स्तर सामान्य होतो आणि पहिल्यासारखा होतो तेव्हा गर्भावस्थेनंतर लिनिया नायग्रा फिकट होत जाते. बाळाच्या जन्मानंतर बरेच आठवडे अथवा महिन्यानंतर ही रेषा नाहीशी होते. काही महिलांच्या बाबतीत ही पूर्ण नाहीशी होत नाही, हे संपूर्णतः नैसर्गिक आणि सामान्य अशी बाब आहे.

(वाचा – जुळ्या बाळांपैकी गर्भातच एक होऊ शकते गायब, तुम्हाला हा आजार तर नाही?)

​गर्भावस्थेदरम्यान लिनिया नायग्रा का वाढते?​

​गर्भावस्थेदरम्यान लिनिया नायग्रा का वाढते?​

पोटात बाळ असताना शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि अस्ट्रोजन हार्मोन अधिक प्रमाणात रिलीज होत असते. गर्भावस्थेदरम्यान भ्रूण अर्थात बाळाच्या आरोग्यासाठी हे दोन्ही हार्मोन्स अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पण या हार्मोन्सचा दुष्परिणाम असतो आणि तो म्हणजे हार्मोन्स अधिक झाल्यामुळे मेलेनिनचे अधिक उत्पादन होते आणि यादरम्यान महिलांच्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारे पिगमेंटेशन दिसून येते. लिनिया नायग्रा हा त्याचाच एक भाग आहे.

हेही वाचा :  दुसऱ्या महायुद्धातील विमानांची हवेत धडक, एअर शोदरम्यान भयानक अपघात; पाहा व्हिडिओ

(वाचा – वॉटर बर्थ थेरपी म्हणजे नेमके काय? कसा होतो बाळाचा जन्म आणि गर्भवतीच्या यातना होतात कमी)

​ही काळी रेषा कशी होईल दूर​

​ही काळी रेषा कशी होईल दूर​

How To Remove Linea Nigra: तुम्ही या काळ्या रेषेला थांबवू शकत नाही. गर्भावस्थेदरम्यान हार्मोनल बदलांमुळे येणाऱ्या या काळ्या रेषेविषयी अधिक चिंता आणि ताण घेण्याची अजिबात गरज नाही. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचीही गरज नाही. पण बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला अधिक काळ ही रेषा दिसत असेल तर तुम्ही तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

​गर्भावस्थेदरम्यान कोणतेही उपचार करू नये​

​गर्भावस्थेदरम्यान कोणतेही उपचार करू नये​

गर्भावस्था आणि स्तनपान करत असणाऱ्या महिलांना लिनिया नायग्रासठी कोणत्याही प्रकारचे त्वचेचे उपचार चालू करू नयेत. अशी काळी रेषा येणं हा सामान्य बदल आहे. साधारण एक वर्षात हे निघून जाते. तुम्हाला हवं असल्यास केवळ त्वचारोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करावी.

सामान्य बाब असणाऱ्या लिनिया नायग्राची माहिती आम्ही आज दिली असून तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …