नवरीवर वरमाई भारी, लग्न कियाराचं पण स्वॅग मात्र आईचा, पिंक लेहंगा-डायमंड दागिन्यांत भासली जणू 20 वर्षाची तरूणी

बॉलीवूड अभिनेत्री Kiara Advani आणि अभिनेता यांनी चक्क प्रेमाच्या आठवड्याचा मुहूर्त साधून म्हणजेच 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला. त्यांच्या या लग्नाची चर्चा अजूनही सुरूच आहे आणि अजूनही लग्नाचे फोटोज सगळीकडे व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर तर दोघांचा हॅशटॅग अजूनही ट्रेंडिंग आहे. तर या लग्नात कियाराने जो लुक कॅरी केला होता त्याची प्रचंड स्तुती झाली आणि ते सहाजिकच होतं. पण सोबतच तिच्या आईचा पिंक लेहंग्यातील लुक सुद्धा समोर आला असून तो तर लोकांना आश्चर्याचा धक्काच देत आहे.

या ग्रँड वेडिंगचे अनेक खास फोटोज समोर येत असून कियाराची आई Genevieve Advani यांचे काही फोटोज समोर आले आहेत. नवरीबाईच्या आईने पेस्टल पिंक कलरचा लेहंगा आणि डायमंडचे भरगच्च परिधान करून कार्यक्रमाची लाईमलाईटच हिरावून घेतली. एवढेच नाही तर अनेकांनी असे म्हटले की जेनविव या कियाराच्या आई कमी आणि लहान बहिणच जास्त वाटत आहेत. उपस्थित असलेल्या प्रत्येक व-हाड्याही असंच वाटलं असणार की सिद्धार्थच्या बायकोपेक्षा त्याच्या सासूचाच जलवा भारी आहे यात काही नवलच नाही..!! (फोटो सौजन्य :- @manishmalhotravows, weddingspaparazzi)

परिधान केला होता डिजाईनर लेहंगा

परिधान केला होता डिजाईनर लेहंगा

कियारा अडवाणीच्या वेडिंग लूकची तर तुफान चर्चा झाली होती आणि आता तिची आई जिनेविव अडवाणीच्या पारंपारिक लूक व्हायरल होताना दिसत आहे. आईने आपल्या मुलीच्या आऊटफिटशी मॅच करणारा पेस्टल गुलाबी लेहेंगा परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. पांढऱ्या शेडच्या या लेहेंग्यावर इंट्रीकेट थ्रेड एम्ब्रॉईडरी करण्यात आली होती. ज्यावर पेस्टल गुलाबी आणि सोनेरी रंगाचे सिक्वीन्स जोडले गेले होते.

हेही वाचा :  नात्यातील नैराश्य घालवण्यासाठी 5-5-5 चा नियम करेल मदत, फक्त हे सोप काम करा

(वाचा :- या IAS ऑफिसरची बायको दिसते खूपच सुंदर, काचेसारखं लख्ख अन् पाण्यासारखं नितळ सौंदर्याची राणीच जणू)​

पेस्टल पिंक कलरचा लेहंगा

पेस्टल पिंक कलरचा लेहंगा

जेनविव अडवाणी यांनी लेहेंग्यासोबत पांढऱ्या रंगाची चोळी घातली होती, ज्यावर पेस्टल पिंक रंगाचे सीक्वेन्स जोडलेले होते. यामुळे या कस्टम मेड आऊटफिटमध्ये एक वेगळेच आकर्षण व शिमरी इफेक्ट अॅड झाला होता. जेनेविव यांनी हेवी एम्बेलिश्ड लेहेंग्यासोबत एक शियर दुपट्टा कॅरी केला होता ज्यामध्ये मॅचिंग एम्ब्रॉईडरी दिऊन येत होती. त्याचवेळी, बॉर्डरवर पेस्टल पिंक रंगाची सिक्विन पट्टी जोडली गेली होती. त्यांनी या लुकसोबत मनीष मल्होत्राने डिजाईन केलेली डायमंड अनकट ज्वेलरी देखीलं परिधान केली होती, ज्यात हार, कानातले आणि बिंदिया होती. मुलीप्रमाणेच आईने देखील नॅच्युरल टोनचा मेकअप केला होता, ज्यामध्ये त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण झाले होते.

(वाचा :- हार्दिक पांड्याला सरप्राईज देण्यासाठी नताशाने गाऊनवर कोरलेल्या 2 अक्षरांचे रहस्य अखेर उघड, बायको असावी तर अशीच )

हळदीमधील लुक

हळदीमधील लुक

कियाराने हळदी समारंभामध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर तिची आई जेनेविव यांनी नारंगी रंगाचा लेहेंगा निवडला होता. लेहेंगा स्कर्ट एकदम प्लेन ठेवला होता. ज्याच्या वेस्टला मल्टीकलर अरुंद अशी एंब्रॉईडरी पट्टी जोडलेली होती. सोबतच त्यांनी मल्टीकलर थ्रेड एंब्रॉइडरीने सजलेली चोळी परिधान केली होती, जी खूप सुंदर दिसत होती. मॅचिंग दुपट्टा आणि सोनेरी पोल्की नेकलेस त्यांच्या लुकला एकदम परफेक्ट बनवत होते.
(वाचा :- लालभडक लिपस्टिक अन् ऑफ शोल्डर टॉपमधील दिशा परमारचा हटके लुक, बायकोची किलर चाल बघून राहुल वैद्यही पार घायाळ..!)​

हेही वाचा :  लग्नानंतरही जात नाहीयेत जुन्या प्रेमाच्या रोमॅंटिक आठवणी? असे व्हा दु:खातून कायमचे मुव्ह ऑन

कियाराच्या ब्राईडल लूकच्या सुद्धा झाल्या चर्चा

कियाराच्या ब्राईडल लूकच्या सुद्धा झाल्या चर्चा

तुम्हाला जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे की कियाराने आपल्या लग्नात घातलेला लेहंगा हा खूप स्पेशल होता. कियाराने तिच्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता, जो पेस्टल पिंक कलरचा होता. लेहेंग्यावर स्वारोवस्की क्रिस्टल्स आणि सिक्विन जोडले गेले. हे आऊटफिट तयार करण्यासाठी सुमारे 6700 तास लागले. मनीष मल्होत्राच्या डायमंड ज्वेलरी कलेक्शनमधील नैसर्गिक हिऱ्यांपासून आणि झांबियाच्या पाचूपासून दागिन्यांचा सेट तयार करण्यात आला होता.
(वाचा :- Kiara-Sidharthच्या रिसेप्शनला अवतरलं बॅकलेस मिनी फ्रॉकमधलं फुलपाखरू, पण लक्ष वेधलं ब्रालेट ब्लाऊजमधील अनन्याने)​

कियाराचा ग्रँड रिसेप्शन व हळदी लुक

कियाराचा ग्रँड रिसेप्शन व हळदी लुक

कियाराने हळदीला ऑफ व्हाइट मोत्यांनी जडलेला लेहेंगा आणि मॅचिंग रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे. पिवळ्या रंगाच्या ओढणीने तिचा हा लुक कम्प्लिट केला होता. सबंध लेहंग्यासोबतच ओढणीवर नाजूक आकर्षक नक्षी कोरण्यात आली होती. हेवी दागिने आणि अगदी नॅच्युरल मेकअपने कियाराच्या चेह-यावर एक वेगळीच लाली चढलेली दिसून येत होती. हा तर झाला हळदीचा लुक पण कियाराच्या रिसेप्शन लुकनेही तितकाच धुमाकूळ घातला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवानीने लागंत खाजगी पद्धतीने केले, पण रिसेप्शन मात्र ग्रँड ठेवले. या ग्रँड रिसेप्शनमध्ये सगळेच ओळखीचे चेहरे उपस्थिती होते हे विशेष आणि का असणार नाहीत कारण हे लग्न बॉलीवूड मधील एक मोस्ट अव्हेटेड लग्न होतं.

हेही वाचा :  पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये कियाराचा स्टनिंग लुक, मल्होत्रांच्या सुनेपुढे अंबानींची सुनही फेल

कियाराने या रिसेप्शनसाठी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला अनोखा फिशटेल गाऊन परिधान केला होता. तिच्या या आऊटफिटमध्ये लांबलचक ब्लॅक व्हेलवेट स्कर्टसोबतच क्रीम-टोन्ड सिल्क टॉप होता. लुक अधिक लक्षवेधक बनवण्यासाठी तिने स्टेटमेंट एमराल्ड अर्थात पाचूचे आणि डायमंडचे दागिने परिधान केले होते. याचवेळी एकदम हलकासा मेकअप, हायलाइटेड चिक्स, काजळाने भरलेले डोळे आणि बनमध्ये बांधलेले केस कियाराचा लुक कम्प्लिट करत होते. दुसरीकडे, सिद्धार्थ एका शिमर ब्लॅक कलरच्या टक्सिडोमध्ये कमालीचा हॅंडसम दिसत होता.

(वाचा :- पारंपारिक ड्रेसमध्ये सारा-जान्हवीची चुरशीची लढत, ही सुंदर की ती? लोभस लावण्यवतींना बघून 2 सेकंद डोकं होईल हॅंग)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घरातील नोकरचाकरांना 654 रुपये पगार, पण कुत्र्यांवर खर्च केले 8,09,384; हे’ भारतीय अब्जाधीश कुटुंब अडकलं वादात

Hinduja Family Accused Of Exploiting Staff : जगभरातील अनेक धनाढ्य कुटुंबांविषयी, त्यांच्या जीवनशैलीविषयी सामान्यांना कायमच …

Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास…; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon Updates) राज्याच वेळेआधीच प्रवेश केला आणि पाहता पाहता तो …