बॉक्स ऑफिसवर फक्त ‘अवतार : वे ऑफ वॉटर’चा डंका; जगभरात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

Avatar The Way Of Water Beats Titanic : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करणाऱ्या या सिनेमाने आता आणखी एक रेकॉर्ड केला आहे. या सिनेमाने आता ‘टायटॅनिक’ (Titanic) या ब्लॉकबस्टर सिनेमाचादेखील रेकॉर्ड तोडला आहे. 

‘अवतार 2’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… (Avatar 2 Box Office Collection) 

‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाने जगभरात 2.2448 बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार, या सिनेमाने जगभरात 1,85,92,44,37,600 चा गल्ला जमवला आहे. आता या सिनेमाने ‘टायटॅनिक’ या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. लियानार्डो डिकैप्रियो आणि कॅट विन्सलेट यांचा ‘टायटॅनिक’ हा सिनेमा 1997 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शनदेखील जेम्स कॅमरॉनने (James Cameron) केलं होतं. या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 

जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यशाचा खरा चेहरा एकच

‘अवतार’ (Avatar), ‘अवतार 2’ (Avatar 2) आणि ‘टायटॅनिक’ (Titanic) या सिनेमांचा समावेश जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत होतो. महत्त्वाची बाब म्हणजे, जेम्स कॅमरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. जेम्स कॅमरॉनने आपल्या अनोख्या दिग्दर्शन शैलीने जगभरातील सिने-रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘अवतार 2’ या सिनेमाने ‘टायटॅनिक’चा रेकॉर्ड ब्रेक केला असला तरी अद्याप या सिनेमाला मार्वल स्टुडिओजच्या ‘एवेंडर्स एंडगेम’ (Avengers Endgame) सिनेमाला मागे टाकता आलेलं नाही. 

हेही वाचा :  'हा मुर्खपणा...'; हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया

‘अवतार 3’ कधी होणार प्रदर्शित? (Avatar 3 Release Date)

‘अवतार 2’ (Avatar 2) हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचे आणखी तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणआर आहेत. ‘अवतार 3’ (Avatar 3) हा सिनेमा 20 डिसेंबर 2024, ‘अवतार 4’ (18 डिसेबर 2026) आणि ‘अवतार 5’ हा सिनेमा 22 डिसेंबर 2028 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ‘अवतार 2’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते या सिनेमाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Avatar 2 Collection : जगभरात ‘अवतार 2’चा डंका; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चौथा सिनेमाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …