लॉरेनचा हार्डी हरवला, मैत्रीचा आदर्श सतीश, अनिल आणि अनुपम

मैत्री म्हणजे सर्वकाही. अनिल कपूर, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी हे नेहमीच सिद्ध करून दाखवलं आहे. गेले ४५ वर्ष या तिघांची घट्ट मैत्री आता सतीश कौशिक यांच्या जाण्याने एक खांदाच निखळल्यासारखं झालं आहे. अनिल कपूर यांनी सकाळपासून कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती यावरूनच त्यांच्यातील घट्ट नातं दिसून येत आहे.

अखेर सोशल मीडियावर अनिल कपूरने सतीश कौशिकसह घालवलेल्या महत्त्वपूर्ण क्षणाचे फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लिहिलेल्या तीन ओळींवरूनही अनिल कपूर यांच्या आयुष्यात किती पोकळी निर्माण झाली आहे याची प्रचिती येत आहे. अशी मैत्री इंडस्ट्रीत दिसणं अत्यंत दुर्मिळ आहे. असा मैत्रीचा आदर्श प्रत्यक्ष आयुष्यातही खरंच असायला हवा. (फोटो सौजन्य – @anilskapoor Instagram)

अशी असावी मैत्री

अशी असावी मैत्री

सुखदुःखात एकत्र राहणारी आणि कायम एकमेकांना जपणारी अशीच या तिघांची मैत्री होती. कोणत्याही मुलाखतीत एकमेकांचे नाव घेतल्याशिवाय अथवा आठवणी सांगितल्याशिवाय कधीच ही मुलाखत पूर्ण झाली नाही. तरूणपणापासून ते अगदी वयाच्या साठीनंतरही ही मैत्री अशीच टिकवून ठेवणे सर्वांनाच जमत नाही. या त्रिकूटाकडून हा मैत्रीचा आदर्श शिकण्यासारखा

हेही वाचा :  Optical Illusion: 'या' फोटोत लपलेले 13 प्राणी शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

लॉरेनचा हार्डी हरवला

लॉरेनचा हार्डी हरवला

अनिल कपूर आणि सतीश कौशिक ही न तुटणारी जोडी होती. अनेक चित्रपटांमध्ये दोघांनीही एकत्र काम केले होते. इतकंच नाही तर दिग्दर्शक म्हणूनही सतीशने अनिल कपूरसह काम केले होते. अनिल कपूरच्या घरातील सोहळ्यापासून ते वैयक्तिक प्रत्येक गोष्टीत सतीशने नेहमीच साथ दिली आणि अनुपम, अनिलने सतीश कौशिक यांना. त्यामुळेच अनिल कपूरने लॉरेनचा हार्डी हरवला हे मनात कुठेतरी दुःख देऊन जातं.

(वाचा – गुडबाय कौशिकंद… नीना गुप्तांची खास मित्रासाठी शेवटची पोस्ट, घट्ट मैत्रीतून या गोष्टी शिकायलाच हव्या)

मित्र हा लहान भावासारखाच

मित्र हा लहान भावासारखाच

मैत्रीमध्ये कधीच वय आडवं येत नाही. सतीश कौशिक हे अनिलपेक्षा वयाने लहान होते. मात्र त्यांच्या मैत्रीत कधीच ही गोष्ट आड आली नाही. एकमेकांना समजून घेत कायम प्रत्येक गोष्टीत त्यांनी साथ दिली. गरिबीपासून ते श्रीमंतीपर्यंत सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या. मैत्रीत ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येकाला शिकण्यासारखी आहे.

(वाचा – हे आरोप नाहीत तर भावना आहेत नवाझुद्धीन सिद्दीकीने अखरे सोडले मौन, नात्यात पुरूषही फरफटले जातात )

शरीराचा एक हरवल्याचा आभास

शरीराचा एक हरवल्याचा आभास

इतक्या वर्षांची मैत्री असल्यानंतर आपल्यातून आपला मित्र निघून गेला आहे हे पचवणं प्रत्येकाला जमतंच असं नाही. अनिल कपूरने दिवसभरातनंतर केलेल्या पोस्टनंतर हे अधिक जाणवत आहे. सतीश कौशिकसह असणारी त्यांची मैत्री ही अत्यंत लाघवी होती आणि त्यानंतर केलेली पोस्ट ही अत्यंत भावनिक आहे.

हेही वाचा :  श्रद्धा वालकर हत्या, घटस्फोट... संसदेत 'लिव्ह-इन'वर बंदी घालण्याची मागणी, तुम्ही सहमत आहात का?

(वाचा – International Women’s Day 2023: आई, बहीण, बायको, मैत्रिणी सकाळीच पाठवा शुभेच्छा संदेश आणि नातं करा अधिक घट्ट)

अखेर फुटला बांध

अखेर फुटला बांध

दिवसभरानंतर अखेर अनिल कपूरने आपल्या मित्रासाठी मनापासून भावनिक पोस्ट लिहित तरूणपणापासूचे सर्व फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर मैत्री असावी तर अशी हे मनात आल्याशिवाय नक्कीच राहात नाही. अनिल कपूरने सतीशवरील आपले प्रेमही व्यक्त केले आहे.
मैत्री ही प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि कोणत्याही नात्यापेक्षा हे आपण निवडलेलं नातं असतं. त्यामुळे आयुष्यातील ही पोकळी कधीच भरून येऊ शकत नाही.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …