Maharashtra Politics: उद्धव ठाकरे बजेटवर बोलताना अजित पवारांनी कुणाला मारला डोळा.. Video चर्चेत

Maharashtra Budget 2023 : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा विधानभवनाबाहेरील एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे यांनी बजेटवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या बाजूला अजित पवार उभे आहेत. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते देखील उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे बजेटवर बोलत असताना अजित पवार कुणाला तरी डोळा मारताना दिसत आहे. अजित पवारांनी नेमका कुणाला मारला डोळा अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister and State Finance Minister Devendra Fadnavis) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. विरोधी पक्षाने या बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. विधानभवनाबाहेर महाविकास आघाडीतील सर्व नेते थांबले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रसारमाध्यमांना बजेटवर प्रतिक्रिया देत असताना अजित पवार यांची वेगळीच बॉडी लँग्वेज पहायला मिळाली.

उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार यांचे याकडे अजिबात लक्ष नव्हते. अजित पवार इकडे तिकडे पाहतात त्यांच्या बाजूला उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर ते हात ठेवतात आणि डावीकडे पाहत हळूच कुणाला तरी डोळा मारतात असे व्हिडिओत दिसत आहे. 

हेही वाचा :  गावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली

अजित पवार यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या कोणत्याही नेत्याशी त्यांची नजरा नजर झालेली नाही. किंवा कुणीही त्यांच्या हालचालींना आणि हावभावांना प्रतिसाद देताना दिसत नाहीत. यामुळे अजित पवार यांनी कुणाला डोळा मारला अशी चर्चा रंगली आहे.

 

उदयनराजे म्हणतात भाजप राष्ट्रवादीचे सरकार येणार

नागालँडमधील एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडीला पाठिंबा देत राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपचे खासदार   उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) यांनी देखील महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार असे सूचक वक्तव्य केले आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? 

विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी  केले होते. संजय राऊतांच्या वक्तव्यावरून अधिवेशनात देखील गदारोळ माजला होता. यावेळी संजय राऊत यांच्या हक्कभंगाच्या कारवाईवरुन महाविकासआघाडीत (mahavikasaghadi) मतभेद पहायला मिळाले होते. अजित पवार आणि नाना पटोलेंनी राऊतांच्या हक्कभंगाचं समर्थनच केल होते.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …