Kunal Khemmu : कुणाल खेमू आणि सोहा अली खानसोबत गैरवर्तन, भररस्त्यात अज्ञात कारचालकाकडून शिवीगाळ

Kunal Khemmu : कुणाल खेमू (Kunal Khemmu) आणि सोहा अली खान (Soha Ali Khan) ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी आहे. त्या दोघांचा सोशल मीडियावर चाहतावर्गदेखील मोठा आहे. त्यांना इनाया नावाची एक गोड मुलगी आहे. कुणाल आणि सोहा नेहमीच इनायासोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. रविवारी सकाळी कुणाल खेमूसोबत एक वाईट घटना घडली आहे. कुणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

कुणालने एका कारचा फोटो शेअर करत लिहिले आहे,”रविवारी सकाळी नऊ वाजता पत्नी सोहा आणि मुलगी इनायासोबत नाश्ता करण्यासाठी जुहूला जात असताना वाटेत एका व्यक्तीने आमच्यासोबत गैरवर्तन केले. एक अज्ञात कारचालक मुद्दाम आम्हाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याने माझ्या गाडीसमोर त्याची कार थांबवली”.



कुणालने पुढे लिहिले आहे,”कार थांबवून तो व्यक्ती कारमधून बाहेर आला. आणि शिवीगाळ केली. ही घटना रेकॉर्ड करण्यासाठी मी खिशातून फोन काढला. पण तोपर्यंत तो व्यक्ती गाडीतून निघून गेला. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो की, या माणसावर कडक कारवाई करावी”.

संबंधित बातम्या

हेही वाचा :  Bappi Lahiri Birth Anniversary : जाणून घ्या वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या बप्पी लाहिरींविषयी...

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा पाहिल्यानंतर जम्मूवासियांचे डोळे पानावले, अश्रू अनावर

Women Centric Films : ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘नीरजा’, स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने, बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींहून अधिक कमाई

Jhund Box Office Collection Day 2 : ‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशीही गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …