कोण खान, कोण कुमार! जोरदार आपटले ‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘रक्षाबंधन’; संपत चाललाय बॉलिवूडचा खेळ?

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार्सच्या नावाची यादी काढली तर आमिर खान (Aamir Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचे नाव नक्कीच टॉप १० मध्ये असेल. पण आता या दोन्ही नायकांवर अशी वेळ आली आहे की दोघांचेही चित्रपट जोरदार आपटले आहेत. प्रेक्षकांनी त्यांच्या बॉलिवूड सिनेमांकडे पाठ फिरवली असून त्यांचे अनेक शो रद्द देखील झालेत. त्यामुळे लोकप्रियतेचं वलय असणारी खान, कुमार किंवा कपूर ही नावही प्रेक्षकांची पावलं थिएटरकडे वळवण्यात अपयशी ठरली आहेत.

हे वाचा-वयाच्या ७२ व्या वर्षी जबरदस्त फिटनेस, पण बॉलिवूडच्या या व्हिलनला आहे अशी भीती

या महिन्यात ११ ऑगस्ट रोजी आमिर खान-करिना कपूर स्टारर ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha Box Office Collection) आणि अक्षय कुमार-भूमि पेडणेकर स्टारर ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan Box Office Collection) हे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमातील कलाकारांनी दणक्यात प्रमोशनही केलं. पण प्रेक्षकराजाच नाराज असल्याने या सिनेमांनी अपेक्षित कमाई केली नाही. त्यामुळे २००-४०० कोटींचा गल्ला कमावणाऱ्या आमिर-अक्षयला प्रेक्षक मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. ५ दिवसांचा वीकेंडही या सिनेमांची बुडती नाव वाचवू शकला नाही. प्रेक्षकच न आल्याने या सिनेमांचे विविध ठिकाणचे शो रद्द करण्यात आले आहेत.


लाल सिंग चड्ढाच्या कमाईमध्ये ७५ टक्के घसरण झाली आहे. सोमवारपर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ४५.७५ कोटींची कमाई केली होती. तर मंगळवारी या सिनेमाने अवघा २ कोटींचा गल्ला जमवला आहे. अर्थात ६ दिवसात केवळ ४७.७५ कोटी जमवण्यात सिनेमाला यश आलं आहे. बॉलिवूडसाठी हा सर्वात मोठा झटका आहे.

हे वाचा-स्वत:लाच मंगळसूत्र घालून अभिनेत्रीने रचला विवाह, म्हणाली- मला पुरुषाची गरज नाही

लाल सिंग चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रेक्षकांची कमतरता लक्षात घेता थिएटर मालकांनी सिनेमाचे १३०० शो रद्द केले होते. मंगळवारी तर आता खूपच कमी कमाई झाली, त्यामुळे तोटा टाळण्यासाठी उर्वरित ७० टक्के शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी तर विविध ठिकाणी असेही शो झाले जिथे १५ प्रेक्षकही पोहोचले नाहीत, त्यामुळे ‘नो शो’ची घोषणा करावी लागली.

रक्षाबंधन या सिनेमाची परिस्थिती देखील वेगळी नाही. ‘लाल सिंह चड्ढा’सोबतच अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ही गुरुवारी रिलीज झाला. या चित्रपटाची अवस्था तर अजूनच वाईट आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षा बंधन’ने मंगळवारी केवळ १.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाची एकूण कमाई ६ दिवसात ३५.१५ कोटी रुपये इतकीच आहे. रक्षाबंधनचे देखील १००० शो रद्द करण्यात आले होते.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous ‘गोदावरी येतोय’, मित्राच्या स्मृतिदिनी जितेंद्र जोशींनी जाहीर केली रिलीज डेट
Next EPFO Recruitment: कामगार आणि रोजगार मंत्रालयात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …