Kitchen Cleaning Hacks : किचनमध्ये टाइल्सवर तेलाचे डाग पडलेत? मग हे उपाय करा, किचन दिसेल चकचकीत

Kitchen Cleaning Hacks best tips:  स्वयंपाकघरात काम करणे प्रत्येक स्त्रीसाठी आव्हानात्मक असते. दररोज अनेक पदार्थ स्वयंपाकघरात बनवत असतात. यामुळे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील भांडी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कधीकधी कुकरच्या शिट्टीतून डाळ बाहेर येणे. तर कधी दुधाला उकळी येते तर कधी दूध ओटयावर सांडून डाग पडतात. अशावेळी महिलांना स्वयंपाकघरातील अनेक कामे एकाच वेळी हाताळावी लागतात. पण काही उपायांनी किचनमधील डाग मिटवता येऊ शकतात आणि तुमचे किचन चकचकीत होऊ शकते. या उपयांबद्दल जाणून घ्या…

जेवण बनवताना अनेकदा किचन टाइल्सवर मसाले, तेलाचे डाग पडतात. साबणाने हे डाग वरचेवर निघतात. पण पूर्णपणे निघत नसतील तर अशावेळी व्हिनेगर आणि बेकींग सोडा यांची पेस्ट बनवावी. ती टाइल्सवर लावावी नंतर टाइल्स स्वच्छ करावी.

व्हिनेगर- आपण स्वच्छतेसाठी व्हिनेगर देखील वापरू शकतो. व्हिनेगर सहज उपलब्ध होईल. एका भांड्यात व्हिनेगर टाका. त्यानंतर वापरात नसलेल्या कापडाला त्यात बुडवा आणि भिजवून पिळून घ्या आणि त्याने भिंतीवरील डाग पुसा. हे डाग काढण्यासाठी व्हिनेगर मदत करू शकते.

बेकिंग सोडा – बेकिंग सोडा हा देखील स्वच्छतेसाठी चांगला पर्याय आहे. बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील टाइल्स साफ करण्यास मदत करू शकतो. यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा. डाग घालण्यासाठी वापरलेले कापड भिजवून त्याने टाइल्य आणि भिंतीवरील डाग स्वच्छ पुसून काढा. याने डाग काढून काढण्यात मदत होऊ शकते. 

हेही वाचा :  श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवलेल्या फ्रीजमध्येच आफताब ठेवत होता जेवण; जबाब ऐकून पोलिसांचाही थरकाप उडाला

लिंबू आणि सोडा- हट्टी डाग आणि चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबू हा सर्वात प्रभावी उपाय आहे. किचनच्या स्वच्छतेसाठी लिंबाचा रस काढा आणि त्याने भिंती पुसा. त्यानंतर सोडा मिसळलेल्या पाण्यात कापड टाकून भिंत स्वच्छ धुवून काढा. 

मीठ- मिठ फक्त खाण्यासाठीच नव्हे तर स्वच्छतेसाठीही वापरले जाऊ शकते. स्वयंपाक करताना टाइल्यवर तेल, मसाल्याचे डाग पडतात. ते स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात दोन ते तीन चमचे मीठ टाका. तसेच थोडा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर या पाण्याने टाईल्सवरील घाण पाण्याने स्वच्छ करा.

वनस्पती तेलाचा वापर- स्वयंपाकासाठी वनस्पतीचे तेल वापरले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, हे तेल आणि ग्रीसचे डाग काढून टाकण्यास मदत करू शकते. यासाठी एक टॉवेल घ्या आणि त्यात थोडे तेल टाका आणि स्वयंपाकघरातील डाग साफ करा. तेल आणि ग्रीसचे डाग साफ करण्यात ते प्रभावीपणे मदत करते हे तुम्हाला दिसून येईल.

डिश वॉश लिक्विड वापरा- एक भांड्यात 2 चमचे डिशवॉशिंग लिक्विड कोमट पाण्यात मिसळा. तेलाचे डाग लवकर काढण्यासाठी हे मिश्रण खूप प्रभावी आहे. या मिश्रणा स्पंज बुडवा आणि डाग पडलेली जागा घासून घ्या. शेवटी स्वच्छ पाण्यात कापड बुडवा आणि डागांसह द्रावण पुसून टाका. 

हेही वाचा :  Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …