Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं…

Chapati Making Tips : चपाती बनवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पण तसं अवघडसुद्धा नाही. कारण योग्य प्रमाण आणि पद्धत वापरली तर तुम्हीसुद्धा उत्तम चपात्या बनवू शकतात. टम्म फुगलेली गरमागरम गव्हाची पोळी खायला  प्रत्येकाला आवडतं. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज पेक्षा कमी नसतं. (roti making tips) अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी इतर गोष्टींना दोष दिला जातो, पण पोळीतला (Wheat Roti) कडकपणा काही करता कमी करता येत नाही. काही साध्या पण चमत्कारीक गोष्टी देखील असतात, त्या पाळल्या तर तुमच्या हातची पोळी देखील मऊ लुसलुशीत होवू शकते. (how to get soft roti)

 बऱ्याचदा चपाती भाजली नाही, कडक झाली किंवा जास्त भाजली गेली तर आपण गव्हू खराब आहे, असं म्हणून आपण मोकळे होतो. पण पीठ मळण्यााआधी एक प्रोसेस आहे, त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. चपात्या करण्याआधी आपण पीठ मळतो. पण त्याचवेळी आपल्या हातून काही चुका देखील होत असतात. त्यामुळे चपात्या नीट येत नाहीत. परिणामी त्या कडक होतात आणि लवकर खराब होतात. (how to get soft roti)

हेही वाचा :  एनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक

पीठ मळताना घ्या ही काळजी 

1- पीठ मळताना कणीक हाताला चिकटत असेल तर समजून घ्या, त्यात खूप पाणी झालं आहे. 2-3 चमचे पीठ घेऊन ताटात ठेवा म्हणजे ते जास्तीचे पाणी शोषून घेईल. (chapati hacks)

2- कणीक खूप कडक झालं असेल  तर त्यात थोडे पाणी घालून पीठ बोटांनी दाबून घ्या. त्यामुळे पिठात पाणी चांगले मुरून जाईल.

3- एकदा का पीठ मळलं की मग ते परातीत ठेवा. त्यावर हलकासा ओला रुमाल करून त्णयावर टाका. कणीक मऊ राहते आणि चपाती देखील मऊ आणि लुसलुशीत येते.  (how to make soft and raound chapati tips)

4- तुम्ही अर्धा किंवा तासापूर्वी कणीक मळून घेतले असेल तर चपाती बनवण्यापूर्वी लगेचच पोळपाटावर ठेवा आणि गोलाकार फिरवा अशाने पोळी चांगली बनते त्याचसोबत लाटायला बरं पडतं. 

5- पीठ मळून लगेच चपाती बनवण्याऐवजी किमान 10 मिनिटांनी चपाती बनवायला घ्यावी. पीठ मळल्यानंतर थोडावेळ ठेवल्यास त्या पिठाच्या चपात्या खूप छान फुलतील..  (cooking tips)

6- एक बाब नीट लक्षात ठेवा 24 तासांपेक्षा जास्त वेळ पीठ मळलेलं असेल तर ते वापरू नका. चपात्या चांगल्या येणार तर नाहीच शिवाय याचा आरोग्यावर परिणामसुद्धा होईल. (Health issues)

हेही वाचा :  'जरांगे हा शरद पवार यांचा माणूस' बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप

7- ज्या भांड्यात पीठ ठेवत आहात त्या भांड्यात तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्या आणि मग त्यात मळलेल्या पिठाचा गोळा ठेवा. असं केल्याने पीठ वाळत नाही.

8- हलके तेल किंवा तूप लावल्याने पीठ वाळत नाही आणि बराच काळ ताजे राहते शिवाय चपात्या छान येतात. . (kitchen cooking hacks how to get fluffy soft chapati phooli hui chapati tips in marathi )



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार …

वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

Confirm Train Ticket: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाला तर आधी कन्फर्म तिकिट असणं महत्त्वाचे असते. …