इथे एकट्यानं यावं, शांत व्हावं आणि निघून जावं; हेमांगी कवी नक्की आलीय कुठे?

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती अनेक तिच्या गोष्टी चाहत्यांना सांगत असते. कधी ती परखड असते, कधी मनस्वी असते. कधी दिलखुलासपणे काही सांगते. आताही ती एका सुंदर ठिकाणी आली आहे. ती पोस्ट तिनं शेअर केली आहे.

हेमांगी लिहिते, ‘साताऱ्याच्या शिरवळ गावाजवळचं नीरा नदीवरलं ब्रिटिशकालीन धरण! व्हिडिओत दिसतंय त्याला वीर धरण बॅकवाॅटर म्हणतात! खूपच सुंदर आहे आणि शांत असलं तरी अफाट आहे. ह्या मार्गे गावाला जाताना इथं थोडा वेळ थांबल्याशिवाय पुढं जाताच येत नाही. प्रत्येक वेळी खूप वेगळं वाटतं आणि खूप काही देऊन जातं. काय ते प्रत्येकाने आपआपलं अनुभवायचं!’

Bigg Boss 16 : रश्मिकानं सलमान खानला दिलं प्रेमाचं औषध, दोघांचा Video झाला व्हायरल

पुढे ती लिहिते, ‘ते म्हणतात ना निर्सग एखाद्या थेरपीसारखा असतो इथं आल्यावर ते १०० % जाणवतं! हा काय पिकनिक स्पाॅट नाही, कधी होऊ ही नये हीच एक प्रार्थना. नाहीतर आहेतच पाण्याच्या कडेला chips ची पाकीटं, cold drinks च्या plastic च्या बाटल्यांचा थर आणि बरंच काही. अशा गोष्टींना इथं बंदीच असायला हवी.’


हेमांगीला वाटतं, इथं एकट्याने यावं, २-३ तास बसावं, निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीशी, तत्त्वाशी संभाषण करावं. त्याला आपलंसं करावं, आपल्या आत भरून घ्यावं, शांत व्हावं आणि निघून जावं! बस!

माझ्या आशूला आयुष्यभर साथ देशील ना, सुलेखा ताईंच्या प्रश्नावर काय आहे अरुंधतीचं उत्तर?

हेमांगी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. सोशल मीडियावर हेमांगी कवी तिला जे वाटते ते मोकळेपणानं व्यक्त करत असते. अनेकदा तिचे हे विचार नेटकऱ्यांना पुरोगामी वाटतात. त्यावरून तिला अनेकदा टीका केली जाते. अर्थात हेमांगी कधीही अशा टीकाकारांना फारसं महत्त्व देत नाही. परंतु टीकाकारांनी जर त्यांची मर्यादा सोडली तर ती अशा लोकांना चोख उत्तर देते.

ऋचा आणि अलीचा ‘रिसेप्शन लूक’, मल्टीकलर ड्रेसनं वेधलं साऱ्यांचं लक्ष



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Zee Marathi वर पुन्हा नवी मालिका; चक्क प्रेक्षकांनी दाखवली उत्सुकता

मुंबई, 08 ऑक्टोबर : मागच्या काही महिन्यांपासून झी मराठीवर सातत्यानं नव्या मालिकांचा सिलसिला सुरू आहे. …

शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं? अभिनेत्रीचं उत्तर ऐकून बसेल धक्का

मुंबई, 08 ऑक्टोबर : सध्या टेलिव्हिजनवर एकाच शोची चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस. मराठी …