Indian Railway : ‘टॉयलेटमध्ये पाणी नाही, जोरात कळ आलीय…’ प्रवाशाने केलं ट्विट, रेल्वेने दिलं असं उत्तर

Indian Railway : सोशल मीडियावर (Social Media) कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावर अरुण नावाच्या एक व्यक्ती चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेनमधून (Long Route Train) प्रवास करताना अरुणने भारतीय रेल्वेला (Indian Railway) एक ट्विट केलं आणि बघता बघता ते संपूर्ण देशभरात व्हायरल (Viral on Social Media) झालं. अनेक युजर्सने यावर मजेशीर तर काहींनी गंभीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने तर हा मुद्दा UN पर्यंत नेण्याचा सल्ला दिला आहे. 

भारतीय रेल्वेने प्रवास
देशभरात दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने (Railway Passengers) प्रवास करतात, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागंत. विशेषत: लांब पल्ल्याच्या ट्रेनमधल्या प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. कधी तिकिट बूक करुनही जागा मिळत नाही, तर कधी ट्रेनमध्ये दिलं जाणारं निकृष्ट जेवण. काही वेळा तर ट्रेनच इतकी घाणेरडी असते की प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागतो. पण यातही सर्वात मोठी समस्या असते ती ट्रेनच्या टॉयलटमध्ये अनेकवेळा पाणीच नसतं. (Indian Railways Toilets)

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी कोट्यवधींची तरतूद
एकीकडे देशाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी (Railway Budget) कोट्यवधींची तरतूद केली जाते. वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वे आणल्या जातात. पण सामान्य प्रवाशांसाठी असलेल्या ट्रेनची अवस्था मात्र अक्षरश: अतिशय वाईट आहे.  उत्तर-प्रदेश, बिहारमधल्या अनेक अनेक ट्रेनची  तर अवस्था अत्यंत बिकट आहे. तक्रारीनंतरही ट्रेनमधल्या पाण्याचा मुद्दा कळीचा बनला आहे. पण एका व्यक्तीने हा मुद्दा थेट सोशल मीडियावर (Social Media) मांडला आहे. टॉयलेटमध्ये पाणी नसल्याची तक्रार त्याने भारतीय रेल्वेकडे केली. पण त्या व्यक्तीचं ट्विट संपूर्ण देशभरात व्हायरल होत आहे. 

हेही वाचा :  Nashik Crime : चोरीची तक्रार, अपहरण अन् कपड्यांची पावती... योगेश मोगरे हत्याकांडाचा गुंता अखेर सुटला

प्रवाशाने सोशल मीडियावर उपस्थित केला प्रश्न
पद्मावत एक्स्प्रेसमधून अरुण नावाचा एक प्रवासी प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याला टॉयलेटला झालं. पण टॉयलेटमध्ये गेल्यावर त्याला कळलं की तिथे पाणीच नाहीए. पाणी नसल्याने तो पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला. पण पोटात जोरात कळ येत असल्याने त्याची अवस्था दैनिय झाली होती. दोन तासांपासून ट्रेनचा प्रवास सुरु होता आणि पुढेही बराच वेळ तो सुरु राहाणार होता. अशा परिस्थितीत काय करावं असा प्रश्न त्याच्यासमोर पडला.

भारतीय रेल्वेचं उत्तर
आपल्या समस्येबाबत त्याने थेट भारतीय रेल्वेला ट्विट केलं. टॉयलेटमध्ये पाणी नाही, जोरात कळ आली आहे, काय करु असं अरुणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. यावर भारतीय रेल्वेचंही तात्काळ उत्तर आलं. अरुणने व्यक्त केलेल्या असुविधेबद्दल रेल्वे विभागाने ट्विटमध्ये खेद व्यक्त केला. यापुढे त्यांनी म्हटलंय, कृपया तिकिटाची संपूर्ण माहिती आणि मोबाईल नंबर आम्हाला द्या. जेणेकरुन आपल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

हेही वाचा :  अक्षय कुमारनं दिली नव्या ब्रँडची माहिती

युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया
भारतीय रेल्वेने ट्विटला उत्तर दिल्याने अरुणने धन्यवाद व्यक्त केलेत. पण अरुणचं ट्विट चांगलंच व्हायरल झालं आणि लोकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका युजरने अरुणचं ट्विट मानव अधिकार आयोग आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनला टॅग केलंय. एका युजरने म्हटलंय, अशा कठिण परिस्थितीत तुम्ही दाखवलेल्या सहशनशीलतेला दाद द्यायला हवी. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …