भारत-श्रीलंका कसोटी मालिका : श्रेयसची झुंजार खेळी; श्रीलंकेची तारांबळ | India Sri Lanka Test Series Shreyas playing hard Sri Lanka played good ysh 95


भारताचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना श्रेयस अय्यरने दडपण झुगारत ९२ धावांची झुंजार खेळी साकारली.

भारताची पहिल्या डावात २५२ धावांपर्यंत मजल

पीटीआय, बंगळूरु

भारताचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना श्रेयस अय्यरने दडपण झुगारत ९२ धावांची झुंजार खेळी साकारली. त्यामुळेच भारताला शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी २५२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर श्रीलंकेची पहिल्या डावात ३० षटकांत ६ बाद ८६ अशी तारांबळ उडाली.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा निरोशन डिक्वेला १३, तर लसिथ एम्बुलडेनिया शून्यावर खेळत होता. श्रीलंका अद्यापही पहिल्या डावात १६६ धावांनी पिछाडीवर असून जसप्रीत बुमरा (३/१५) आणि मोहम्मद शमी (२/१८) या वेगवान जोडीने श्रीलंकेला हैराण केले. तत्पूर्वी, श्रेयसने ९८ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह ९२ धावा काढल्या. कारकीर्दीतील दुसऱ्या शतकाकडे कूच करीत असताना प्रवीण जयविक्रमाच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचीत झाला. श्रेयसने पाचव्या गडय़ासाठी ऋषभ पंतच्या साथीने ४०, सातव्या गडय़ासाठी रविचंद्रन अश्विनच्या साथीने ३५, आठव्या गडय़ासाठी अक्षर पटेलच्या साथीने ३२ आणि १०व्या गडय़ासाठी जसप्रीत बुमराच्या साथीने २३ धावांच्या भागीदाऱ्या केल्या. पंतने पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देताना २६ चेंडूंत ३९ धावा केल्या.

हेही वाचा :  मालमत्ता, मद्य, वाहन, ई-कॉमर्स, इंधनावरील कराचा तिजोरीला हातभार; आदरातिथ्य, पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवनाची प्रतीक्षा

या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच अपेक्षेप्रमाणेच प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मयांक अगरवाल (४) धावचीत झाला. मग रोहित शर्मानेही (१५) निराशा केली. हनुमा विहारी (३१) आणि विराट कोहली (२३) यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ४७ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पण विराटला पुन्हा शतकी खेळी साकारण्यात अपयश आले. विहारी, कोहली बाद होताच श्रेयसने सामन्याची सूत्रे स्वीकारली. श्रीलंकेकडून एम्बुलडेनिया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : ५९.१ षटकांत सर्व बाद २५१ (श्रेयस अय्यर ९२, ऋषभ पंत ३९, हनुमा विहारी ३१; लसिथ एम्बुलडेनिया ३/९४, प्रवीण जयविक्रमा ३/८१)

’ श्रीलंका (पहिला डाव) : ३० षटकांत ६ बाद ८६ (अँजेलो मॅथ्यूज ४३, निरोशन डिक्वेला १३*; जसप्रीत बुमरा ३/१५, मोहम्मद शमी २/१८)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राज ठाकरे खरंच दुपारी झोपेतून उठतात का? स्वत: खुलासा करत म्हणाले, ‘माझ्याबद्दल…’

Raj Thackeray Morning Wake Up Time: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या त्यांनी लोकसभा …

लोकांना हसवून करा ‘इतकी’ कमाई! स्टॅंडअप कॉमेडीमध्ये करिअरची सर्व माहिती

Career in Standup Comedy: तुम्हाला लोकांना हसवायला आवडतं? तुम्ही लोकांना हसवू शकता? तुम्हाला लाफ्टर शो …