१६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फिरकीपटू वॉ़शिंग्टन सुंदर या मालिकेतून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे सुंदर सामने खेळू शकणार नाही. बायो बबल प्रोटोकॉलमुळे बीसीसीआय बदली खेळाडू देऊ शकत नसल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात १६, १८ आणि २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.
The post IND vs WI : पहिल्या टी-२० मॅचपूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘स्टार’ खेळाडू पडला मालिकेबाहेर! appeared first on Loksatta.