पोटात बनतो गॅस-अ‍ॅसिडिटी? लगेच चघळा ही गोष्ट, पचनक्रिया मजबूत व डायबिटीज-कोलेस्ट्रॉलसारखे 10 आजार होतील छुमंतर

भारतात स्वयंपाकासाठी विविध मसाले वापरले जातात. धणे, जिरे, काळी मिरी, लवंग आणि बडीशेप यांसारखे मसाले जेवणाची चव तर वाढवतातच पण ते आरोग्यदायी म्हणून सुद्धा ओळखले जातात. यापैकी बडीशेप हा एक असा चविष्ट मसाला आहे, जो अन्नाला छान सुगंध देण्यासोबतच पचनाशी संबंधित विकार दूर करतो. यामुळेच बहुतेक लोकांना जेवणानंतर बडीशेप खायला आवडते. इतर मसाल्यांच्या तुलनेत, बडीशेप आपल्या हृदयासाठी आणि आतड्यांसाठी एक उत्तम मसाला आहे. साधारणत: मसाले हे गरम असतात आणि पोटातील उष्णता वाढते ज्यामुळे शरीराला आराम मिळत नाही पण बडीशेप थंड असते आणि ती पोट थंड ठेवण्याचे काम करते.

आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांच्या मते, बडीशेप पचनासाठी उत्तम आहे. ती थंड तर असतेच आणि गोड गुणधर्मांमुळे पित्त वाढविल्याशिवाय अग्नि (पाचन अग्नी) मजबूत आणि उष्ण करते. बडीशेपला एक त्रिदोष औषधी वनस्पती सुद्धा मानले जाते जी वात आणि कफ संतुलित करते आणि ही गोष्ट चांगल्या पचनासाठी आवश्यक आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

बडीशेपमधील औषधीय गुणधर्म

बडीशेपमधील औषधीय गुणधर्म

आपल्यापैकी अनेक जण बडीशेपला खूप साधे समजतात किंवा काही जण असे आहेत जे जेवणानंतर बडीशेप खायची सवय असते म्हणून बडीशेप खात असतात. पण मंडळी, या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतातजे फार कमी लोकांना ठावूक असतात. चला तर तेच गुणधर्म आज जाणून घेऊया.

  1. गुना – लघू (पचायला हलके) आणि स्निग्धा (स्निग्ध, तेलकट)
  2. रस (चव) – गोड, तिखट आणि कडू
  3. विपाक (पचनाच्या प्रभावा नंतर) – गोड
  4. वीर्य (शक्ती) – गरम
  5. वात आणि कफ शांत करणारा
हेही वाचा :  ऐश्वर्या रायने जेव्हा नेटची साडी नेसून सास-यांसोबत मारली एंट्री, बच्चन कुटुंबातील सूनेचा हॉट लुक पाहून लोक झाले घायाळ!

(वाचा :- पोट साफ न झाल्याने आतडी जातात पूर्ण सडून, दुधात मिसळून प्या हा एक पदार्थ, झटक्यात बाहेर पडेल पोटातील सर्व घाण)​

बडीशेपचे आयुर्वेदिक फायदे

बडीशेपचे आयुर्वेदिक फायदे

बडीशेपला आयुर्वेदात सुद्धा खूप मोठे स्थान आहे. बडीशेपचे आयुर्वेदात अनेक असे फायदे सांगितलेले आहे जे फार कमी लोकांना ठावूक आहेत. चला तेच फायदे आज आपण जाणून घेऊया.

बाल्या – शक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
पित्तसरदोषजित – अति उष्णतेमुळे होणार्‍या रक्तस्रावावर उपयुक्त
अग्निकृत – पचन सुधारते
हृदय – हृदयासाठी चांगले, कार्डियाक टॉनिक
शुक्रापहा, आयुष – कामोत्तेजना निर्माण करणारे नाही
योनिशूलनट – मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त

(वाचा :- रोज या 5 चुका करणारे लोक खेळतायत स्वत:च्या जीवाशी जीवघेणा खेळ, दुसरी चूक अत्यंत घातक, आजच सोडा नाहीतर..!)​

स्तनपानासाठी फायदेशीर

स्तनपानासाठी फायदेशीर

बडीशेप हा मसाला आहे, जो महिलांसाठी उत्तम प्रभावशाली ठरतो. बडीशेपच्या रसाचा धातुवर विशेष प्रभाव पडतो, ज्यामुळे स्तनदा मातांमध्ये दुधाचा प्रवाह वाढतो. अनेक अशा स्त्रिया असतात ज्यांना स्तनपानावेळी समस्या होऊ शकते किंवा दूध बाहेर येत नाही. अशा स्त्रियांना बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा उपाय प्रत्येक स्त्रीसाठी उपयोगी ठरलेच असे नाही. पण जाणकार मात्र याचा फायदा होतो असे सांगतात.

हेही वाचा :  मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य

(वाचा :- Cancer Survivor Story: वयाच्या 17व्या वर्षी झाला कॅन्सर, डॉक्टरांनीही मानली हार, पण या 6 पद्धतींनी जिंकली लढाई)​

आयुर्वेदानुसार हे विकार होतात नष्ट

आयुर्वेदानुसार हे विकार होतात नष्ट

आयुर्वेदात सांगितले आहे की बडीशेप खाल्ल्याने काही विकास नष्ट होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कोणते आहे ते विकार जे बडीशेपमुळे संपुष्टात येऊ शकतात.

  1. कृमी – किडे/जंत
  2. बद्धवित – बद्धकोष्ठता
  3. अनिला – वात / सूज
  4. दाहा – जळजळ जाणवणे
  5. अरुची – अनास्था, अन्नामध्ये रस नसणे
  6. चर्दी – उलटी
  7. कासा – खोकला, सर्दी

(वाचा :- World Cancer Day : संधोशनात दावा – 1 नाही तब्बल 34 प्रकारच्या कॅन्सरचं मुळ आहेत रोज खाल्ले जाणारे हे 15 पदार्थ)​

बडीशेपचे अन्य फायदे

बडीशेपचे अन्य फायदे

बडीशेपचे एवढेच फायदे आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर थांबा. बडीशेपचे अन्य सुद्धा अनेक फायदे जाणकार सांगतात. जे आपल्याला माहित असायला हवे. जेणेकरून आपण बडीशेपकडे केवळ एक जेवणानंतर खाल्ला जाणारा पदार्थ म्हणून न पाहता एक औषधी मसाला म्हणून पाहू शकतो. बडीशेप मधील गुणधर्म मन ताजेतवाने करतात आणि मानसिक सतर्कता वाढवतात. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. बडीशेप श्वसनसंस्थेतील वाढलेला कफ देखील कमी करते, यामुळे फुफ्फुस स्वस्थ राहते.

हेही वाचा :  Valentine's Day: 'व्हॅलेंटाईन्स डे'ला कपल्सना पाहून डोक्यात तीव्र सणक जाते? एकटेपणावर अशी करा मात

(वाचा :- डायबिटीज, ब्लड प्रेशर, खराब कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर फेकण्यासाठी खा हे 5 पदार्थ, चहा-कॉफीला चुकूनही लावू नका हात)​

कसे करावे बडीशेपचे सेवन?

कसे करावे बडीशेपचे सेवन?

जेवणानंतर 1 चमचा बडीशेप खाणे हे आरोग्य सुधारण्याचा उत्तम उपाय आहे. वजन कमी करणे, डायबिटीज, PCOS, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल आणि इतर आतड्यांसंबंधी विकारांसाठी बडीशेपचा चहा बनवून प्यावा. पित्त आणि उष्णतेशी संबंधित विकार शांत करण्यासाठी थंड सरबत बनवावे आणि त्यात बडीशेप टाकावी. या शिवाय अन्य अनेक मार्गांनी सुद्धा तुम्ही बडीशेपचे सेवन करू शकता.

(वाचा :- मुळव्याध, पोट साफ न होणं, डायबिटीज यासारखे शरीर आतून पोखरणारे तब्बल 20 भयंकर आजार मुळापासून उपटतात या 6 गोष्टी)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …