प्रतीक्षा संपली! ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी (Oscar Nominations 2023) जाहीर केली जाणार आहे. आज (24 जानेवारी) ऑस्कर नॉमिनेशन लिस्टची घोषणा कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. 

कुठे आणि कधी पाहता येणार सोहळा?

ऑस्कर डॉट कॉम, ऑस्कर डॉट ओआरजी तसेच अॅकॅडमी  डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऑस्कर नॉमिनेशन सोहळा पाहता येईल. भारतातील प्रेक्षकांना हा सोहळा संध्याकाळी सात वाजता पाहता येणार आहे.

ऑस्कर- 2023 साठी भारताकडून ‘आरआरआर’ आणि ‘छेल्लो शो’ हे चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे. नामांकन यादीमध्ये या चित्रपटांचा समावेश होईल का? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. 

हेही वाचा :  TVF संस्थापक अरुणाभ कुमारची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

या कॅटेगिरीमधील नामांकन यादी होणार जाहीर 

सहाय्यक भूमिका (अभिनेता)
सहाय्यक भूमिका (अभिनेत्री)
अॅनिमेटेड फीचर फिल्म
अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म
कॉस्टुम डिझाइन
लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म
मेकअप आणि हेअर स्टायलिंग
संगीत (ओरिजनल स्कोअर)
साऊंड
लेखन (रूपांतरित पटकथा)
लेखन (मूळ पटकथा)
प्रमुख भूमिकेत अभिनेता
प्रमुख भूमिकेत अभिनेत्री
सिनेमॅटोग्राफी
दिग्दर्शन
डॉक्युमेंट्री फिचर फिल्म  
डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म  
फिल्म एडिटिंग
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
संगीत (ओरिजनल साँग)
सर्वोत्तम पिक्चर
प्रोडक्शन डिझाइन
व्हिज्युअल इफेक्ट्स

ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलिवूड डॉल्बी येथे पार पाडणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 24 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत… मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …