SBI मध्ये तुमचं खातं आहे? खातेधारकांसोबत होत आहे ‘हा’ ऑनलाइन फ्रॉड, कशी घ्याल काळजी?

नवी दिल्ली : जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची बातमी आहे. कारण अलीकडेच SBI च्या खातेधारकांसोबत फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. याच फ्रॉडमुळे एका व्यक्तीची थेट ९.६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचंही समोर आलं आहे. तर अशी फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. याविषयी सविस्तर जाणून घेऊया…

फसवणूक कशी होते?
एका व्यक्तीने SBI कर्मचारी असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक केली. यामध्ये एका व्यक्तीला फोन करून तो बँक एजंट असल्याचे सांगण्यात आले. असे करून समोरील व्यक्तीकडून खाजगी माहिती मिळवली आणि नंतर बँक खात्यातील रक्कम लंपास केली.

काळजी घेण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

  • पेमेंट करण्यासाठी नेहमी अधिकृत अॅप किंवा वेबसाइटला भेट द्या. तेच पेमेंट करण्यापूर्वी साइटची पडताळणी केली पाहिजे. म्हणजे वेबसाइटचे डोमेन नाव आणि URL तपासले पाहिजे.
  • पासवर्ड किंवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका. तसेच बँकेशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करू नये.
  • जर कोणी फोन करून ऑनलाइन बँकिंगची माहिती मागितली, तर त्याची माहिती पोलीस आणि बँकेला द्यावी.
  • इंटरनेट बँकिंग पर्सनल कंप्युटर किंवा मोबाईल फोनवर लॉग इन करुनच करायला पाहिजे. तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असलेल्या इंटरनेट किंवा पीसीवर अँटी-व्हायरस वापरला पाहिजे. ज्या पीसी आणि स्मार्टफोनवर इंटरनेट बँकिंग वापरली जाते त्याच पीसी आणि स्मार्टफोनवर नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम वापरली जावी. इंटरनेट बँकिंग वापरण्यासाठी अधिकृत अॅप वापरणे आवश्यक आहे.
हेही वाचा :  डिपॉझिट तयार ठेवा; तब्बल 1 लाख रुपयांच्या Discount सह खरेदी करा 'या' दमदार कार

वाचा : Smartwatch युजर्ससाठी आनंदाची बातमी, WhatsApp नं आणलं एक खास फीचर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …