Valentine’s Day: ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला कपल्सना पाहून डोक्यात तीव्र सणक जाते? एकटेपणावर अशी करा मात

Valentine’s Day म्हणजे प्रेमाचा दिवस. या दिवशी काही लोक आपल्या मनातील भावना आपल्या जोडीदारासोबत शेअर करतात.
पण अशा परिस्थिती काही लोक असेही आहेत जे या दिवशी एकटे असतात. इतरांना पाहून त्यांच्या एकटेपणावर दुःखी होऊ शकतात. ज्या लोकांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे त्यांना या दिवसाचा राग येऊ शकतो. हा दिवस का आला असा प्रश्न त्यांच्या मनात येऊन जावू शकतो. आपल्यावर कोण का प्रेम करत नाही हा विचार या लोकांना सतत जाणवत असतो. पण दुसऱ्यांचा विचार करुन तुम्ही स्वत:ला विसरुन जाता. या संदर्भात, हुसेन मिनावाला, बियॉन्ड थॉट्स अँड जिओमेट्रीचे संस्थापक यांनी एकाकीपणाच्या तणावावर मात करण्यासाठी काही प्रभावी टिप्स देखील शेअर केल्या आहेत. तुम्हीही अविवाहित असाल तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही त्याच्या मदतीने स्वतःला खास बनवू शकता. (फोटो क्रेडिट- Istock)

स्वतःला स्पेशल फिल द्या

स्वतःला स्पेशल फिल द्या

Valentine’s Day च्या दिवशी सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र आणि सहकाऱ्यांकडून मिळालेली फुले आणि चॉकलेट्स पाहणे तुम्हाला आवडत नसेत तर तुम्ही या गोष्टींची मदत घेऊ शकता. या दिवशी जर तुम्हाला एकटेपणा वाटत असेल, तर तुम्ही व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या पत्त्यावर फुले मागवू शकता. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी ऑर्डर करुन तुम्ही स्वत:ला स्पेशल फिल करु शकता.

हेही वाचा :  तुमच्या साध्या टीव्हीला बनवा ‘स्मार्ट’, ‘हे’ छोटेसे डिव्हाइस येईल खूपच उपयोगी, Amazon Prime, Netflix वापरणे शक्य

या दिवशी तुम्ही हे कामही करू शकता

या दिवशी तुम्ही हे कामही करू शकता
  1. या दिवशी तुम्ही तुमचे छंद जोपासून व्हॅलेंटाईन डे साजरा करा.
  2. स्पा करुन बॉडी रिलॉक्स करा.
  3. तुमचा आवडता पदार्थ खा.
  4. तुमचा आवडता चित्रपट किंवा टीव्ही मालिका पाहा.
  5. नवीन कसरत करून पाहा.
  6. विवाहित किंवा अविवाहित नसल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करा.
  7. हा दिवस तुमचाच आहे असा विचार करा.

(वाचा :- Kiss Day 2023: काय आहे ‘6 सेकंड किस थेअरी’ संकल्पना ऐकूनच हादरुन जाल, हेल्दी रिलेशनशिप नक्की ट्राय करा) ​

एखाद्या व्यक्तीचा दिवस चांगला बनवा

एखाद्या व्यक्तीचा दिवस चांगला बनवा

या दिवशी तुम्ही इतरांना चांगले फिल करुन देऊ शकता. या दिवशी अशा व्यक्तीशी बोला ज्याच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत परंतु बरेच दिवस तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही आहात. तुम्ही त्यांना फुले किंवा चॉकलेट पाठवू शकता. या गोष्टीमुळे नकारात्मकता आणि तणाव कमी करण्यास मदत होते.

(वाचा :- Kiara-Sid Reception : शिमरी ड्रेसमध्ये दिशा पटानीच्या काटाकिर्र अदा, चाहते म्हणतात ही तर उर्फी 2.0)

कुटुंबाला वेळ द्या

कुटुंबाला वेळ द्या

Valentine’s Day हा दिवस केवळ कपल्सचा नसतो. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत देखील हा दिवस साजरा करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबियांसोबत व्हॅलेंटाईन डे देखील साजरा करू शकता. तुमचा स्वतःचा व्हॅलेंटाईन डे तयार करा. असे केल्याने अविवाहित असाल तर तुम्हाला एकटे वाटणार नाही. या दिवशी रोमँटिक चित्रपट पाहणे आणि गाणी ऐकणे टाळा, कारण यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो.

हेही वाचा :  माझी कहाणी : दोन वर्षांची रिलेशनशिप, नंतर माझ्यासोबत जे घडलं ते वाचून थरकाप उडेल, बॉयफ्रेंड माझ्यासोबत...

(वाचा :- कोणी गोंदवलं हातावर नाव तर कोणी प्रेमासाठी धर्मच बदलला, बॉलिवूड स्टार्सनी जोडीदारांना भन्नाट स्टाईलमध्ये केलं propose)

सोशल मीडियापासून दूर राहा

सोशल मीडियापासून दूर राहा

तुम्ही single असाल तर 14 फेब्रुवारीला फोन फ्री डे साजरा करा. सोशल मीडियापासून शक्यतो दूर राहा. या दिवशी तुम्ही तुमच्या ex सोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क टाळला पाहिजे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

शहरात मोक्याच्या ठिकाणी असलेला बंगला बळकावण्यासाठी बिल्डरने रचला भयंकर कट; वृद्ध दाम्पत्याला…

सागर गायकवाड, झी मीडिया  Nashik News Today:  शहरात मोक्याच्या ठिकाणी आपली प्रॉपर्टी वा बंगला असेल …

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …