Breaking News

HSC Result 2022: इंटरनेट नसेल तरी असा पाहा बारावीचा निकाल

HSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary) बारावीचा निकाल(HSC Result 2022) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना व्यतिरिक्त www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या वेबसाइटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल पाहता येणार आहे. दरम्यान निकाल जाहीर झाल्यावर इंटरनेटचा गोंधळ झाला तर काय करायचं? असा प्रश्नही काही विद्यार्थ्यांना पडला आहे. या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. यासोबतच एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे इंटरनेट नसले तरीही निकाल सर्वात आधी तुमच्या थेट मोबाइलमध्ये येऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुमच्या मोबाईलमधून एक एसएमएस पाठवावा लागणार आहे. याच्या सुरुवातीला कॅपिटलमध्ये MHHS असे टाईप करुन त्यापुढे रोल नंबर टाइप करावा लागेल. हा एसएमएस ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर काही क्षणातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाने ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत बारावी बोर्डाची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत सुमारे १४.७२ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. परीक्षा संपल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांत मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली. मात्र मध्यंतरी शिक्षक संपावर गेल्याने ते पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे निकालाला विलंब होत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्व विद्यार्थी mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर बारावीचा निकाल आणि त्यासंदर्भातील अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील.

HSC Result 2022: बारावीचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी ‘या’ ट्रिक्स येतील उपयोगी
HSC Result 2022: असा तपासा निकाल
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर जा.
येथे होमपेजवर निकाल पेजवर क्लिक करा.
एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
महाराष्ट्र बारावीचा निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर भरा आणि सबमिट करा.
बारावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
त्यानंतर तुम्ही MSBSHSE HSC निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आवश्यक तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल दिसेल. तुम्ही त्याची प्रिंट आउट देखील घेऊ शकता.

बारावीचा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in

12th Result 2022: कुठे, कसा पाहाल बारावीचा निकाल?

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Result : निकाल काहीही येवो, निराश होऊ नका; ‘हे’ दिग्गजही परीक्षेत नापास पण जीवनात मात्र टॉपर
Next अरुण गोविल यांनी घेतली नवी कार! चाहते म्हणाले पुष्पक विमानाच्या जागी नवी कार…

Check Also

Internship Courses: विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप कोर्सेस तयार करुन ‘क्रेडिट’ द्या- AICTE

म. टा. प्रतिनिधी, पुणेविज्ञान तंत्रज्ञानातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशिन लर्निंग या विषयांमध्ये पदवी किंवा …

RTE Admission: आरटीई प्रवेशप्रक्रियेमध्ये असमन्वय, पालकांसह अधिकारीही संभ्रमात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गतच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण संचालनालय आणि जिप. शिक्षण …