कोरोनाप्रमाणेच घातक ठरतोय नवा H3N2 Virus, किती धोकादायक

देशात जेव्हा कोरोना आजाराचे रूग्ण सुरू झाले होते, तेव्हा पहिले दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र त्यातून दोन वर्षांनी आता देश सावरत असताना पुन्हा एकदा आजाराचं नवं सत्र सुरू झालं आहे. H3N2 Virus मुळे आता चिंता वाढू लागल्या आहेत. त्यामुळे इन्फ्लुएन्झा आजारदेखील आता कोरोनाप्रमाणे डोकेदुखी तर ठरणार नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे.

एच३एन२ इन्फ्लुएन्झा आजाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गर्भवती महिला, मुलं आणि वयस्कर व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी भारतात यामुळे मृत्यू झाल्याचे वृत्तही पसरले आहे. त्यामुळे नक्की या आजाराचा धोका कितपत आहे हे समजून घ्यायला हवे. (फोटो सौजन्य – iStock)

कुठून आलाय H3N2 व्हायरस?

-h3n2-

देशात गेल्या काही महिन्यात तापाची लाट दिसून येत आहे. यामध्ये सर्वात जास्त संक्रमण हे H3N2 Virus Influenza असल्याचे दिसून येत आहे. याला ‘हाँगकाँग फ्लू’देखील म्हटलं जातं. आतापर्यंत देशात H3N2 आणि H1N1 इन्फेक्शनबाबत माहिती आली आहे. मात्र घाबरून जायची गरज नाही, तर पुन्हा एकदा सर्वांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

हेही वाचा :  महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी लोहाचे महत्त्व, अन्यथा होऊ शकतो अ‍ॅनिमिया

कुठे झालाय पहिला मृत्यू?

कुठे झालाय पहिला मृत्यू?

सध्या देशात H3N2 व्हायरसच्या साधारण ९० केस असल्याचे सांगण्यात येते आहे. कर्नाटकमधील हासनमध्ये ८२ वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आता समोर येतेय. २४ फेब्रुवारी रोजी या आजाराने रूग्णालयात दाखल झालेल्या एच. गौडा या व्यक्तीचे १ मार्च रोजी निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर H1N1 आजाराच्या ८ केस असल्याचे वृत्त सांगण्यात आले आहे.

(वाचा – Weight Loss: काकडी खाण्याने वजन कमी होते का? उन्हाळ्यात असा करा काकडीचा उपयोग)

नव्या व्हायरसचे कोरोना कनेक्शन

नव्या व्हायरसचे कोरोना कनेक्शन

H3N2 आणि H1N1 व्हायरसची लक्षणे ही कोविड अर्थता कोरोनाशी मिळतीजुळती असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षात कोरोनामुळे ७० लाखपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. नुकतेच यातून बाहेर पडत असताना आता पुन्हा एकदा नव्या व्हायरसने डोके वर काढले आहे.

(वाचा – Health Tips: रोज सकाळी प्याल धणे पाणी तर थायरॉईडसह अनेक आजारांवर करू शकाल मात)

H3N2 ची लक्षणे, डॉक्टरांकडे कधी जावे?

h3n2-

ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल अथवा नाक वाहत असेल तर वेळीच सावधान व्हा. थकवा, उलटी, घशात दुखणे, शरीरात ताकद न राहणे, डायरियासारखी लक्षणे असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जावे. ही लक्षणे साधारण आठवडाभर दिसून येतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा व्हायरस संक्रमित होणारा असून खोकणे अथवा शिंकणे यामुळे पसरू शकतो. यामुळेच कोरोनाच्या लक्षणांशी याची तुलना करण्यात आली आहे. त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

हेही वाचा :  पावसासोबतच मुंबईवर COVID-19 आणि H3N2 भयानक विषाणूचे सावट

(वाचा – PCOS समस्येतून बाहेर यायचे असेल तर हे पदार्थ खावे, आयुर्वेदातील नियम ठरतील फायदेशीर)

कोणासाठी ठरू शकतो जास्त धोकादायक?

कोणासाठी ठरू शकतो जास्त धोकादायक?

हा आजार कोविडप्रमाणेच समाजावा. H3N2 Virus Influenza चे संक्रमण वयस्कर व्यक्ती आणि मुलांना अधिक प्रमाणात होऊ शकते. तसंच डायबिटीस, कॅन्सर असे गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही काळजी घ्यावी. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनीही वेळीच काळजी घ्यायला सुरूवात करावी.

ICMR चे आवाहन

icmr-

डॉक्टरांनी पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला दिला असून ICMR ने खोकताना अथवा शिंकताना तोंड झाकण्याचे आवाहन केले आहे. ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या संपर्कात राहू नये. तसंच स्वतः मास्क लावावा. नाक आणि डोळ्यांना सतत हात लावणे टाळा. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पॅरासिटेमॉल अथवा क्रोसिनसारख्या औषधांचे सेवन करू नका.

डिस्क्लेमरः हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …