महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी लोहाचे महत्त्व, अन्यथा होऊ शकतो अ‍ॅनिमिया

शरीरात लोहाची कमतरता ही सर्रास आढळून येणारी पोषणविषयक समस्या आहे. यावर वेळीच उपचार केले न गेल्यास, थकवा जाणवणे आणि अ‍ॅनिमियासारख्या विविध समस्या जाणवू लागतात. शरीरात लोह कमी असेल तर होणाऱ्या अ‍ॅनिमियाची सर्वसामान्य लक्षणे कोणती त्याबद्दल जाणून घेऊयात टाटा सॉल्ट आयर्न हेल्थच्या, पोषण सल्लागार, कविता देवगण यांच्याकडून. (फोटो सौजन्य – iStock)

​आपल्या शरीरामध्ये लोह असणे का गरजेचे आहे?​

​आपल्या शरीरामध्ये लोह असणे का गरजेचे आहे?​

लोह हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असतो. प्रत्येक व्यक्तीच्या, खासकरून महिला व मुलांच्या आहारात पुरेशा प्रमाणात लोह असलेच पाहिजे. लोह हा हिमोग्लोबिनचा एक भाग आहे, आपल्या संपूर्ण शरीरापर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन करते. आपल्या शरीरातील जवळपास ७०% लोह लाल रक्तपेशींमध्ये आढळते.

​लोह कमी असल्यास अ‍ॅनिमिया​

​लोह कमी असल्यास अ‍ॅनिमिया​

शरीरामध्ये लोह कमी असेल तर अ‍ॅनिमिया होतो. एकंदरीत आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारामध्ये पुरेशा प्रमाणात लोह असलेच पाहिजे. आकलनाशी संबंधित सर्वसामान्य कामे सुरळीतपणे पार पाडली जाण्यात लोहाचे लक्षणीय योगदान असते आणि म्हणूनच वाढत्या वयातील मुलांसाठी लोह हा एक महत्त्वाचा पोषण घटक आहे.

हेही वाचा :  Weight Loss Journey : 95 किलो वजनामुळे कंबर-गुडघे दुखीचा त्रास, चक्क तूप आणि सोया खाऊन केला 28 किलो वेट लॉस

(वाचा – पोटात जाताच हे ४ पदार्थ वाढवतात LDL Cholesterol, कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक)

​अ‍ॅनिमियाची सर्वसामान्य लक्षणे कोणती​

​अ‍ॅनिमियाची सर्वसामान्य लक्षणे कोणती​
  • कोणतेही विशेष कारण नसताना थकवा येणे
  • कमजोरी जाणवणे
  • चक्कर येणे
  • कोणतीही थंड गोष्ट, थंड तापमान सहन न होणे
  • अगदी थोडेसे शारीरिक काम केले तरी धाप लागणे (उदाहरणार्थ, काही पायऱ्या चढल्यानंतर)
  • छाती दुखणे आणि धाप लागणे
  • चिडचिड होणे
  • भूक न लागणे

(वाचा – स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, तज्ज्ञांकडून सखोल माहिती)

​लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी उपाय कोणते ?​

​लोहाचे प्रमाण वाढण्यासाठी उपाय कोणते ?​
  • शरीरात लोहाचे प्रमाण वाढावे यासाठी तुमच्या नेहमीच्या आहारात चरबी कमी असलेले मांस, लिव्हर, फोर्टिफाईड सिरीयल आणि सोया नट्स यासारख्या लोहयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करा
  • प्रुन्स, डाळिंब, कलिंगड आणि फीग या ताज्या फळांमध्ये आणि मनुका, ऍप्रिकॉट्स, खजूर आणि पीच यासारख्या सुकवलेल्या फळांमध्ये देखील लोह भरपूर प्रमाणात असते
  • अगदी सहजसोपा मार्ग म्हणजे तुम्ही विश्वसनीय ब्रँडचे आयर्न फोर्टिफाईड मीठ वापरू शकता, त्यामुळे तुमच्या दैनंदिन लोह आवश्यकतेपैकी २५% पर्यंत (एक वाटी भरून पालकामधून जेवढे लोह मिळते तेवढे) गरज त्यातून पूर्ण होईल
हेही वाचा :  डिलिव्हरी एंजटने बलात्कार करत हत्येचा प्रयत्न केला; 18 वर्षीय तरुणीचा आरोप, कंपनी म्हणते 'ही आमची समस्या नाही'

(वाचा – लघ्वी होताना जळजळ होत असेल तर डाएटमध्ये करा असे बदल)

​डॉक्टरांची भेट कधी घ्यावी?​

​डॉक्टरांची भेट कधी घ्यावी?​

तुम्हाला लोहाची कमतरता होत असल्याची चिन्हे जाणवू लागल्यावर त्वरीत डॉक्टरांना भेटावे. स्वतः कोणतेही औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच उपचार करा. शरीरात अति लोह झाल्यासदेखील त्रास होऊ शकतो. लोह साचून राहिल्यास यकृत, स्वादुपिंड, हृदयावर परिणाम होऊन इतर गुंतागुत होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …