Hair Growth : 1 महिन्यात कंबरेपेक्षाही लांब व घनदाट होतील केस, टक्कल पडलेल्या जागीही येतील केस, फक्त करा ‘हे’ घरगुती उपाय!

आपले केस सुद्धा लांबसडक व घनदाट असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. लांबसडक केस हे आपला लुक सुद्धा अजून भन्नाट करतात. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचे केस सुद्धा कंबरेपर्यंत लांब व्हावेत आणि त्यासाठी तुम्ही अनेक उपाय सुद्धा ट्राय करून पाहिले असतील, पण जो उपाय दुसऱ्यासाठी उपयोगी पडला तोच तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल असे नाही कारण प्रत्येकाच्या केसांची जडणघडण वेगळी असते. त्यामुळे उपायांचा परिणाम सुद्धा वेगळा होणारच! पण निराश होऊ नका. जरी आजवर कोणताही उपाय तुमच्या केसांसाठी रामबाण ठरला नसेल तरी आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत जे सहसा फार कोणाला माहित नाहीत. हे उपाय तुमच्या केसांसाठी नक्कीच प्रभावी ठरू शकतात. (फोटो साभार: freepik)

तिळाच्या तेलात मिक्स करा मेथीदाणे

तिळाचे तेल आणि सोबत त्यात मेथी दाणे मिक्स करून वापरल्याने केसांना मोठे पोषण मिळते. केसाला हे कसे लावावे ते आपण जाणून घेऊया. सर्वात आधी मेथी दाणे ड्राय रोस्ट करून घ्या आणि मग त्याची पावडर बनवा. आपल्या केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात मेथी पावडर घ्या आणि त्यात 1 चमचा तिळाचे तेल मिक्स करा. लक्षात ठेवा की तुम्हाला तेल खूप जास्त टाकायचे नाही आहे. कारण तुम्हाला केवळ आपल्या टाळूला एक्सफोलिएट करायचे आहे. काही वेळ एक्सफोलिएट करून झाल्यावर अर्धा तास असेच सोडून द्या आणि मग हेअर वॉश करा. आठवड्यातून 2 वेळा तरी हा उपाय करावा. (फोटो साभार: indiatimes)

हेही वाचा :  Restaurant Of Mistaken Orders : 'या' हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?

(वाचा :- Hair Care Tips : चहापावडरचा असा वापर केल्यास कमी वेळात मिळतील लांबसडक, घनदाट व कापसासारखे रेशमी केस, फक्त माहित हव्या ‘या’ 4 पद्धती!)

ऐलोवेरा जेल

हा सगळ्यात सोप्प्या उपाय आहे आणि तुम्ही करून पाहिलाच पाहिजे. ऐलोवेरा केसांसाठी खूप फायदेशीर समजले जाते. याची जेल देखील तितकीच प्रभावी असते. यामुळे स्कॅल्प मॉइस्चराइज होते आणि केसांची खुंटलेली वाढ पुन्हा वेगाने सुरु होते. तुम्ही ही जेल स्कॅल्पवर लावून केवळ 30 मिनिटे ठेवायची आहे. हवं असल्यास तुम्ही यामध्ये तिळाचे तेल सुद्धा मिक्स करू शकता आणि केसांना लावू शकता. महिनाभर सतत अप्लाय केले तर तुम्हाला याचा जबरदस्त प्रभाव पाहायला मिळेल. पण प्रिझर्व्ह केलेल्या ऐलोवेरा जेलचा सहसा वापर करू नका. घरच्या घरीच ताज्या कोरफडीचा गर काढून त्याचा वापर करणे कधीही उत्तम! (फोटो साभार: indiatimes)

(वाचा :- Yoga Asanas For white Hair : वयाच्या 70री नंतरही केस राहतील काळेभोर व लांबसडक, फक्त डेली रूटीनमध्ये समाविष्ट करा ‘या’ 5 गोष्टी!)

आवळा ज्यूस

आवळा पावडर तुम्ही आवळा ज्यूसचा वापर आपल्या केसांवर करू शकता. व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेला आवळा केसांच्या वाढीसाठी खूप पोषक असल्याचे सांगितले जाते आणि ती गोष्ट खरी सुद्धा आहे बरं का! आवळा ज्यूस तुम्ही थेट केसांवर अप्लाय करा किंवा तुमच्या स्कॅल्प वर लावा आणि काही वेळ तसेच सोडून द्या. यानंतर 35 ते 40 मिनिटांनी साध्या पाण्याने केस धुवून घ्या. किमान 1 ते 2 महिने तरी हा उपाय वापरा. (फोटो साभार: indiatimes)

हेही वाचा :  पोटावर झोपल्याने चेहऱ्यावर येतात पिंपल्स, तुमच्या या वाईट सवयींनी चेहरा मुरुमांनी भरतो

(वाचा :- White Hair Remedies : पांढरे केस होतील चुटकीमध्ये काळेभोर व चमकदार, 1 रूपयाही न खर्च करता घरच्या घरी बनवा ‘हा’ नॅच्युरल उपाय..!)

कांद्याचा रस

हो मंडळी, आपल्या रोजच्या वापरातला कांदा सुद्धा केसांसाठी फायदेशीर आहे बरं का! कांद्याचा रस हा केसांवर एखाद्या जादूसारखा काम करतो. म्हणून अनेक लोकं आपल्या हेअर रुटीन मध्ये याचा वेगवगेळ्या प्रकारे वापर करतात. तुम्हाला जर मोठे केस हवे असतील तर कांद्याचा रस हा उत्तम उपाय आहे. तुम्ही तुमच्या हेअर मास्क मध्ये किंवा हेअर ऑईल मध्ये सुद्धा मिक्स करून अप्लाय करू शकता. बदाम तेल, कांद्याची पेस्ट, व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून हेअर पॅक बनवा आणि मग केसांवर लावा. 45 मिनिटांनी केस धुवून घ्या. (फोटो साभार: pexels)

(वाचा :- Remedies For Hair Growth : 1 महिन्यात 4 ते 6 इंचाने लांबसडक व घनदाट होतील केस, 60ठी नंतरही गळणार नाहीत, करा ‘हे’ उपाय!)

तुळशीच्या पाण्याचा वापर

हा उपाय फार कमी लोकांना ठाऊक आहे, पण हा उपाय खूप जास्त प्रभावी ठरू शकतो. जर तुमच्याकडे हेअर पॅक लावण्यासाठी वेळ नसेल तर तुळशीच्या पानांचा वापर करा. यासाठी एक भांड्यात 3 ग्लास पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवून द्या. आता यात तुळशीचे 20 ते 25 पाने मिक्स करा. पाणी चांगले उकळवून घ्या, जेणेकरून त्यातील रस पाण्यात मिक्स होईल. आता जेव्हा हे उकळेल तेव्हा थंड होण्यासाठी सोडून द्या. आता शॅम्पू केल्यावर या पाण्याने आपले केस स्वच्छ धुवून घ्या. या वेळी बोटांनी स्कॅल्पला मसाज देखील करा. यामुळे तुम्हाला खूप फायदा दिसून येईल.

हेही वाचा :  Imran Khan Arrested: इम्रान खान यांना अटक! पाक रेंजर्सने कोर्टाबाहेरुन घेतलं ताब्यात

(वाचा :- Mira Rajput hair fall : केस गळतीने वैतागलेल्या मीरा राजपूतने कापले पौर्णिमेच्या दिवशी केस, सांगितले किती कामी आला ‘हा’ उपाय..!)

करा कोकोनट मिल्कचा वापर

नारळाच्या दुधाचा वापर मुली अनेकदा हेअर मास्कसाठी करतात. मात्र, हेअर मास्कसोबत इतरही अनेक घटक वापरावे लागतात. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नारळाच्या दुधात ऑलिव्ह ऑईल मिसळून टाळूची मालिश करा. उरलेले मिश्रण केसांना लावा, यामुळे केस रेशमी आणि चमकदार दिसतील. (फोटो क्रेडिट्स: pexels)

(वाचा :- Amla Uses For Skin : 50 शीत दिसायचं आहे 20 शी सारखं तरूण? मग फक्त 10 रूपयांच्या ‘या’ गोष्टीचा असा करा वापरा..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा …